मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एक आघात आणि कुटुंब विखुरलं; जवानाच्या आत्महत्येनंतर बायकोनं स्वत:ला पेटवलं, तर भावाला...

एक आघात आणि कुटुंब विखुरलं; जवानाच्या आत्महत्येनंतर बायकोनं स्वत:ला पेटवलं, तर भावाला...

(File Photo)

(File Photo)

Indian Soldier Suicide: भारतीय सैन्यातील एका जवानाने आपल्या बायकोला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. जवानाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबच बिखरलं आहे.

पाटणा, 29 मार्च: भारतीय सैन्यातील (Indian army) एका जवानाने आपल्या बायकोला व्हिडीओ कॉल (Video call) करून आत्महत्या (soldier suicide by shooting himself) केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवऱ्याला डोळ्यादेखत मरताना पाहून भेदरलेल्या महिलेनं देखील स्वत: वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं (Wife set herself on wife) आहे. भाऊ आणि वहिनी सोबत घडलेला प्रकार कळताच जवानाच्या मोठ्या भावाला हृदय विकाराचा झटका आला आहे. एकाच दिवशी कुटुंबावर तिघेरी आघात घडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्दैवी घटनेत जवानाची बायको गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जवानाच्या भावाला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याच्यावर देखील उपचार केले जात आहेत. महेश सिंह असं आत्महत्या करणाऱ्या जवानाचं नाव होतं. ते हैदराबाद येथे 16 बिहार रेजिमेंटमध्ये नायक पदावर तैनात होते. तर गुडिया देवी असं मृत जवानाच्या पत्नीचं नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा-कठोर मेहनत घेऊनही पदरी निराशा, वडिलांना VIDEO कॉल करत तरुणानं केला भयावह शेवट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना बिहार राज्यातील आरा येथील उदवंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पियनिया गावात घडली आहे. घटनेच्या दिवशी रविवारी दुपारी एकच्या सुमारास मृत जवान महेश यांनी आपल्या बायकोला व्हिडीओ कॉल केला होता. काही वेळ दोघांमध्ये बोलणंही झालं. मात्र त्यानंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.  महेश यांनी व्हिडीओ कॉल सुरू असताना पत्नीच्या डोळ्यादेखत स्वत:वर सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडली आहे.

हेही वाचा-नोकरीच्या बहाण्यानं पुण्यात आणलं अन्..; सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दोघींची सुटका

नवऱ्याला डोळ्यादेखत मरताना पाहून भेदरलेल्या महिलेनं स्वत: वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं आहे. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेश हा काही दिवसांपासून तणावात होता. पत्नी गुडिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, असंही काही जणांचं म्हणणं आहे. पण त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून असं टोकाचं पाऊल उचललं याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. दुसरीकडे भाऊ आणि वहिनीसोबत घडलेल्या प्रकारामुळे हार्ट अटॅक आलेल्या जवानाच्या भावावर देखील उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Bihar, Crime news, Suicide