वॉशिंग्टन, 16 जानेवारी : गुजरातमधील (Gujrat) एका व्यक्तीने फोन कॉलच्या (fake phone calls) माध्यमातून अमेरिकतील (america) अनेक वृद्ध लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा (fraud) घातला आहे. फसवणूक करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती भारतीय व्यक्ती आहे. शहजाद खान पठाण (shahjad Khan Pathan) असं या आरोपी व्यक्तीचं नाव असून तो गुजरातमधील अहमदाबाद येथे कॉल सेंटर (call center) चालवण्याचा व्यवसाय करतो. शहजादने आपला गुन्हा कबूल केला आहे.
आरोपी व्यक्तीने संगणकाच्या माध्यमातून अमेरिकेतील वयोवृद्धांकडून 80 लाख डॉलर्सपेक्षा अधिक म्हणजे जवळपास 58. 52 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी 14 मे 2021 रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. अमेरिकेत कटकारस्थान रचून धोका देणाऱ्या आरोपीला किमान 20 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
पैसे वसूल करण्यासाठी शहजादने बर्याच लोकांना नोकरीला ठेवलं होतं
39 वर्षीय शहजाद अमेरिकेत राहणाऱ्या वयोवृद्धांना संगणकाद्वारे कॉल करत असे. त्यांना गोड बोलून विश्वास संपादन करत असे, त्यानंतर या लोकांना बनावट स्कीमच्या आधारे पैसे वसुल करायचा. जर कोणी पैसे पाठवण्यास टाळाटाळ करत असेल, तर त्यांना कायद्याची भीती दाखवून कारवाई करण्याची धमकीही देत असे. लोकांना धोका देवून पैसे वसूल करण्यासाठी शहजादने या रॅकेटमध्ये अनेक लोकांना भरती करून घेतलं होतं.
हे ही वाचा- Cyber Crime च्या जाळ्यात अडकू नका; नोकरी शोधताना या गोष्टींची घ्या काळजी
आरोपी शहजादने व्हर्जिनिया, न्यू जर्सी, मिनिसोटा, टेक्सास, कॅलिफोर्निया, दक्षिण कॅरोलिना आणि इलिनॉयस येथील काही लोकांना हाताशी धरून गुन्हेगारी जाळं उभारलं होतं. भरती होणारे लोक प्रथम पीडितांकडून पैसे घेत असत आणि नंतर ते पैसे शहजादला पाठवत असत. भारतात पैसे पाठविण्यासाठी केवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खातीच उघडली नाहीत, तर हवालाचाही वापर करण्यात येत असे. न्याय विभागानं म्हटलं आहे की, शहजाद खान पठाणने जवळपास पाच हजाराहून अधिक लोकांची फसवणूक केली असून त्यांना किमान आठ दशलक्ष डॉलर्सचा चुना लावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Cyber crime, United States of America