भारतीय युवकाने केली गर्लफ्रेंडची हत्या, 45 मिनिटं गाडीच्या पुढच्या सीटवर घेऊन फिरला आणि...

भारतीय युवकाने केली गर्लफ्रेंडची हत्या, 45 मिनिटं गाडीच्या पुढच्या सीटवर घेऊन फिरला आणि...

या युवकावर आरोप आहे की त्याने आपल्या मैत्रिणीची हत्या केली आणि 45 मिनिटांसाठी शहरामध्ये फिरत राहिला. त्याने मृतदेह गाडीच्या पुढच्या सीटवर ठेवला होता.

  • Share this:

दुबई, 20 मार्च : युएईच्या दुबई कोर्टाने रविवारी एका भारतीय युवकावर तिच्या मैत्रिणीची हत्या केल्याबद्दल आरोप निश्चित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युवकावर आरोप आहे की त्याने आपल्या मैत्रिणीची हत्या केली आणि 45 मिनिटांसाठी शहरामध्ये फिरत राहिला. त्याने मृतदेह गाडीच्या पुढच्या सीटवर ठेवला होता. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरात भीतीचं वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, तो एका रेस्टॉरंटमध्ये थांबला आणि जेवणाची ऑर्डरही देत होता. यानंतर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची माहिती दिली. या प्रकरणात पीडितेच्या वकिलाने फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

आपल्या प्रेयसीने फसवणूक केल्याच्या संशयावरून 27 वर्षीय तरुणाने तिचा गळा आवळून खून केला. दोघेही पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. हत्येपूर्वी तिने मैत्रिणीच्या घरी ईमेल देखील केला होता. असे म्हटले होते की जर ते लोक खटला सोडवण्यासाठी आले नाहीत तर तो त्याला ठार करील.

युवकाने खुनाची कबुली दिली

एका पोलिस अधिकाऱ्याने कोर्टाला सांगितले की, “जेव्हा मी पोलीस स्टेशनला आलो तेव्हा मला धक्का बसला. त्याच्या कपड्यांना रक्त लागलं होतं. तो घाबरला आणि म्हणाला की त्याने आपल्या मैत्रिणीची हत्या केली आहे. मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर पडला होता. मागची सीट रक्ताने माखलेली होती. त्यानंतर मला गाडीतून चाकूही सापडला. ''

या संपूर्ण प्रकरणाची नोंद करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी गाडीतून तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2020 12:29 PM IST

ताज्या बातम्या