तब्बल 300 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त; 8 पाकिस्तानी नागरिकांना अटक

तब्बल 300 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त; 8 पाकिस्तानी नागरिकांना अटक

भारतीय कोस्ट गार्डने एका बोटीतून तब्बल 300 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त केलं आहे. सोबतच 8 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल: गुजरात एटीएस आणि भारतीय कोस्ट गार्डने (Indian Coast Guard) गुरुवारी गुजरातमधील कच्छ जिल्ह्याच्या किनारपट्टीभागात एक मोठी कारवाई केली आहे. सममुद्रातील एका बोटीवर कारवाई करत 30 किलोग्रॅम हेरॉईनचा साठा जप्त (30 kg Heroin seized) केला आहे. या बोटीवर आठ पाकिस्तानी नागरिक उपस्थित होते. या आठही जणांना अटक (8 Pakistani Nationals arrested) करण्यात आली आहे. कोस्ट गार्डने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंगळवारी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सागरी सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानी नौकेद्वारे अमली पदार्थ्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

कोस्ट गार्डने आपल्या निवेदनात पुढे म्हटलं, अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने गुजरात एटीएस सोबत संयुक्त कारवाई केली. बुधवारी रात्री पाकिस्तानी नौका भारताच्या सागरी हद्दीत आल्यावर तटरक्षक दलाने या नौकेला घेरलं. यानंतर तपासणी केली असता तेथून 30 किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 300 कोटी रुपये इतकी आहे.

प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, नौकेच्या माध्यमातून पाकिस्तानातून गुजरातमध्ये अमली पदार्थांची तस्करी होत होती. ही नौका, हेरॉईनचा साठा आणि नौकेवर उपस्थित असलेल्या आठ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आले आहे. या सर्वांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

वाचा: दुर्दैवी..! एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

तटरक्षक दलाने गेल्या वर्षभरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. तटरक्षक दलाने वर्षभरात जवळपास 5,200 कोटी रुपये किंमत असलेला 1.6 टनहून अधिकचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारे गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डने ऑपरेशन्स पार पाडत कारवाई केली आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 15, 2021, 6:36 PM IST

ताज्या बातम्या