मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बायकोच्या हत्या प्रकरणात भोगला तुरुंगावास; 9 वर्षांनी पत्नीला जिवंत पाहून हादरला पती

बायकोच्या हत्या प्रकरणात भोगला तुरुंगावास; 9 वर्षांनी पत्नीला जिवंत पाहून हादरला पती

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Kidnap and Murder Case: 9 वर्षांपूर्वी ज्या बायकोच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment) झाली होती. तिच बायको तब्बल 9 वर्षांनी जिवंत आढळली आहे.

पाटणा, 18 मार्च: 9 वर्षांपूर्वी ज्या बायकोच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात तुरुंगवासाची (Imprisonment) शिक्षा झाली होती. तिच बायको तब्बल 9 वर्षांनी जिवंत आढळली (Married woman found alive after 9 years) आहे. संबंधित विवाहित महिला एका बाजारात फिरताना आढळल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींना धक्काच बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेतलं आहे. तसेच खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी माहेरच्या लोकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

उषा कुमारी असं अटक केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. तर विजय कुमार असं शिक्षा झालेल्या पतीचं नाव आहे. विजय कुमार हे आपल्या पत्नीसह बिहारमधील गया शहरानजीक असणाऱ्या अबगिला येथे वास्तव्याला होते. त्यांची पत्नी उषा नऊ वर्षांपूर्वी अचानक गायब झाली होती. या प्रकरणी माहेरच्या मंडळींनी पती विजय कुमार, सासू आणि दिराविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पती विजयला तीन महिन्यांचा कारावास देखील झाला होता. तर सासूला उच्च न्यायालयातून जामीन घ्यावा लागला होता. हा खटला अद्याप न्यायालयात आहे. तसेच तपासाअंती पोलिसांनी विजयचं नाव केसमधून वगळलं होतं.

हेही वाचा-'मुलीला डॉक्टर बनवायचं होतं पण सगळं असह्य होतंय' चिठ्ठी लिहून बापलेकीनं दिला जीव

याबाबत अधिक माहिती देताना दीर रणजीत यांनी सांगितलं, 'एके दिवशी सायंकाळी आमची बहीण दूध आणण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी त्यांना नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली आपली वहिनी दिसली. वहिनीला असं जिवंत पाहून तिला धक्काच बसला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने घरी येऊन आम्हाला याची माहिती दिली. पत्नी जिवंत असल्याचं कळाल्यानंतर पती विजय आणि कुटुंबीय उषाच्या माहेरी गेले. मात्र तिनं दुसरं लग्न करणार असल्याचं सांगत सासरी येण्यास नकार दिला. त्यानंतर विजयनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा-दहावीची परीक्षा द्यायला गेली अन् परतलीच नाही; लेकीच्या विरहात आईचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत उषाला ताब्यात घेतलं आहे. एखादी महिला सात वर्षे सापडली नाही, तर तिला मृत समजलं जातं. संबंधित महिला नऊ वर्षांनी परतल्याने तत्कालीन साक्षींच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. तसेच खोटी फिर्याद दाखल केल्याप्रकरणी माहेरकडील लोकांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Bihar, Crime news, Kidnapping, Murder