Home /News /crime /

पुण्यात सख्ख्या मुलानेच केला बापाचा खून; मावस भावाची मदत घेत मृतदेहाचा बंदोबस्त

पुण्यात सख्ख्या मुलानेच केला बापाचा खून; मावस भावाची मदत घेत मृतदेहाचा बंदोबस्त

काही दिवसांपूर्वी पुण्यात एक बेवारस मृतदेह सापडला होता. त्याचा खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला होता.

पुणे, 17 जून : पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपदेव घाटात (Pune News) एक बेवारस मृतदेह सापडला होता. त्याचा खून करून मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला होता. कोंढवा पोलिसांनी या खून प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावला असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक (Pune Crime News) करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मुलानेच मावस भावाच्या मदतीने आपल्या वडिलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. पवन देबू शर्मा (वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचा मुलगा सोनू पवन शर्मा (वय 25) आणि मावस भाऊ शैलेंद्र गोवर्धन अहिरवार (वय 20) या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. वडील (Killed Father) दारू पिऊन सतत आईला मारहाण करत असल्याच्या रागातून त्याने हा खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन याला दारू पिण्याचं व्यसन होतं. दारू प्यायल्यानंतर तो मुलगा सोनू आणि पत्नीला नेहमी मारहाण करायचा. 13 जूनच्या रात्री देखील तो दारू प्यायला आणि घरी आल्यानंतर पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी पवन शर्मा याला बाहेर नेले आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्यांचा खून केला. फोन केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बोपदेव घाटात फेकून दिला. दरम्यान मृतदेह सापडल्यानंतर कोंढवा पोलीस याप्रकरणी तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना मयत व्यक्तीचे नाव आणि तो राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता मिळाला. त्यांनी घरी जाऊन चौकशी केली असता सोनू शर्मा आणि शैलेंद्र अहिरवाड दोघे बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, Murder, Pune

पुढील बातम्या