पाटना, 24 जानेवारी : बिहारमधील (Bihar News) बक्सर जिल्ह्यातील एका माथेफिरू तरुणाने एक मुलीचं जीवन उद्ध्वस्त केलं. त्याने तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा केला. आर्मीमध्ये (Army) जाण्याची इच्छा असणाऱ्या तरुणीची दृष्टी गेली. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी ती रनिंगसाठी मैदानावर पोहोचली, मात्र परत घरी आलीच नाही. तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 तरुणांनी तिच्यावर हल्ला केला होता. तिला आधी मारहाण करण्यात आली, आणि नंतर डोळ्यात चाकू घुपसला. घटनेच्या तीन महिन्यांनंतर चंपा कुमार रुग्णालयात आहे आणि सर्व आरोपी बाहेर मोकाट आहेत. ही संपूर्ण घटना डेरा गावातील आहे. या संपूर्ण घटनेला 2 महिने उलटून गेले. मात्र एकाही आरोपीला पोलीस अटक करू शकले नाहीत. दुसरीकडे अद्यापही तरुणीवर उपचार सुरू आहेत.
रनिंगदरम्यान झाला हल्ला...
दैनिक भास्करसोबत बोलताना चंपाने सांगितलं की, ती रनिंगसाठी गेली होती. यावेळी बगीच्यात काही तरुण आले आणि ते मला मारहाण करू लागले. पहिल्यांदा एका तरुणाने मला कानशिलात लगावली. त्यानंतर अन्य तरुण मारहाण करू लागले. त्यानंतर सुऱ्याने माझ्यावर हल्ला केला. सैन्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दररोज 3 ते 4 किमी रनिंग करीत होते. त्या दिवशीही आईला एका ठिकाणी बसवून मी धावत होते.
हे ही वाचा-मास्क घालून शिरला क्लिनिकमध्ये, अन् एकट्या बसलेल्या महिला डॉक्टरवर केला Attack
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये बीए पार्ट-1 ची परीक्षा देण्यासाठी गेले होते. यावेळी बबलू नावाच्या तरुणाने सांगितलं की, जर तरुणीने माझ्याशी लग्न केलं नाही तर तिला कोणासोबतच लग्न करण्यालायक ठेवणार नाही. तिला कधीही लग्न करायचं असेल तर ती माझ्यासोबतच करेल. मात्र मी त्यावेळी त्यांच्या कमेंट गांभीर्याने घेतलं नाही. 2021 च्या 12 नोव्हेंबरच्या सकाळी बबलूने मित्रांसह माझ्यावर हल्ला केला. पीडिता चंपा कुमार चारही आरोपींना ओळखते. मुख्य आरोपी बबलू कुमारच्या वडिलांचं नाव राधा मोहन आहे. अद्याप तो पकडण्यात आलेला नाही. घटनेनंतर आरोपी फरार आहेत. पोलीसही त्यांचा शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack, Bihar, Crime news