मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

विचित्र! प्रेमात माथेफिरू तरुणाने प्रेयसीचे नाक आणि कान कापले; नंतर बसला रडत

विचित्र! प्रेमात माथेफिरू तरुणाने प्रेयसीचे नाक आणि कान कापले; नंतर बसला रडत

भररस्त्यात तरुणाने प्रेयसीचं नाक आणि कान कापले.

भररस्त्यात तरुणाने प्रेयसीचं नाक आणि कान कापले.

भररस्त्यात तरुणाने प्रेयसीचं नाक आणि कान कापले.

  • Published by:  Meenal Gangurde

कटिहार, 8 नोव्हेंबर :  अनेकदा तुम्ही प्रेमी जोडप्यांनी हाताची नस कापली किंवा आत्महत्या सारखं पाऊल उचलल्याविषयी ऐकलं असेल. मात्र बिहारमधील (Bihar News) कटिहार येथे एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापले. ही घटना कटिहार जिल्ह्यातील आहे.

येथील एक महिला रविवारी छठ पूजेसाठी गंगा स्नान करण्यासाठी गेली होती. या दरम्यान पौर्णिया नगर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशपुर येथील राहणारा प्रीतम कुमार तेथे पोहोचला आणि महिलेसोबत गैरवर्तणूक करू लागला. यानंतर त्याने महिलेला मारहाण केली आणि तिचं नाक आणि कान कापले.

तरुणाला झाली आपल्या चुकीची जाणीव

यानंतर तरुणाने आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. प्रीतमने रडत रडत सांगितलं की, तो आपल्या प्रेयसीला देवा मानतो. मात्र ही चूक कशी झाली माहीत नाही. पुढे तो म्हणाला की, त्याला काहीच सांगायचं नाही. त्याला आपल्या प्रेयसीची बदनामी करायची नाही. तर दुसरीकडे पीडितेने सांगितलं की, तरुणाने पैसे घेतले होते, आणि ते त्याला परत करायचे नव्हते. तो नेहमी पती आणि मुलांना मारण्याची धमकी देत असतो. रविवारी तो आला आणि मारहाण करू लागला. यादरम्यान तेथे असलेल्या लोकांनी महिलेला वाचवलं.

हे ही वाचा-घृणास्पद! दिवाळीच्या रात्री दारूच्या नशेत मुलाने सख्ख्या आईवर केला बलात्कार

पोलिसांनी आरोपीला केली अटक..

या प्रकरणात रुग्णालयाचे डॉक्टर उदयन कुमार यांनी सांगितलं की, रविवारी दुपारी साधारण 1.30 वाजता महिला आणि तरुणाला रुग्णालयात आणलं होतं. दोघेही जखमी झाले होते. महिलेचं नाक आणि कान कापलं होतं. पोलिसांनी पीडितेच्या प्राथमिक तक्रारीनंतर तरुणाला अटक केली आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात महिलेने प्रेम संबंधाबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news