• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • सासू-सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन; तरुणाने फायनान्स कार्यालयात घेतला गळफास

सासू-सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन; तरुणाने फायनान्स कार्यालयात घेतला गळफास

Suicide in Kolhapur: आगर येथील एका फायनान्स कार्यालयात 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 • Share this:
  शिरोळ, 19 ऑक्टोबर: आगर येथील एका फायनान्स कार्यालयात 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या (31 years old man commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी मृताच्या सासू सासऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. सासुरवाडीच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळूनच तरुणाने आत्महत्या केल्याचं मृत तरुणाच्या भावानं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी शिरोळ पोलिसांत विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. गजानन आप्पासाहेब गरडे असं आत्महत्या करणाऱ्या 31 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर महादेव रामू जाधव आणि विद्या महादेव जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या सासू-सासऱ्यांची नावं आहेत. दोघंही बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील मायाक्का चिंचली येथील रहिवासी आहेत. किरण बबन शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या तिसऱ्या आरोपीचं नाव असून तो गणेशवाडी येथील रहिवासी आहे. बहिणीच्या अनैतिक संबंधातून निरागस भावाची हत्या; विचित्र घटनेनं नागपूर हादरलं! याप्रकरणी मिरज तालुक्यातील माळेवाडी नरवाड येथीतल रहिवासी असणाऱ्या संजय आप्पासाहेब गरडे यांनी शिरोळ पोलीस ठाण्या फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीनुसार, मृत गजानन याची पत्नी प्रगती गरडे यांनी 30 जून 2021 विष प्राशन करून आत्महत्या केली होती. प्रगती यांच्या आत्महत्येसाठी संशयित आरोपींनी गजानन याला जबाबदार धरलं होतं. तसेच गजानन विरोधात मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच संशयित आरोपी गजानन याच्याकडे पैशांची मागणी करत त्याला अनेकदा धमक्या देत होते. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून गजानने सोमवारी आगर येथील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या भावाने शिरोळ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरोळ पोलीस करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: