जळगाव, 15 फेब्रुवारी : कोरोनाकाळात (corona) चोरीचे (robbery) प्रकार खूपच वाढले आहेत. रात्री काय किंवा दिवसाढवळ्या काय चोरटे रोख रक्कम आणि लाखोंचे मौल्यवान दागिने (jewellery) लांबवत आहेत.
47 वर्षीय जिनेंद्र मधुकर सैतवाल यांचं कुटुंब जामनेर इथं भाचीच्या लग्नासाठी गेलं होतं. त्यावेळी चोरट्यांनी (robbers) डाव साधला. त्यांनी जिनेंद्र यांच्या बंद घराचं कुलूप तोडलं आणि मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 20 हजार रुपये रोख आणि पत्नीचे दागिने (jewellery of wife) असा 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनेंद्र सैतवाल (jinendra Sainwal) हे न्यू वेअर हाऊसिंग इथं नोकरी करतात. पत्नी कविता, मुलगी साक्षी यांच्यासह ते कानळदा रस्त्यावर राधाकृष्ण नगरात राहतात. मुलगी साक्षी हिचं 7 मार्चला लग्न आहे. याची सगळी खरेदी सैनवाल यांनी केली होती.
15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या भाचीचं लग्न (marriage) जामनेर इथं होतं. आपल्या कुटुंबासह ते शनिवारी संध्याकाळी घराला कुलूप लावून त्यांच्याकडे गेले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शेजारी राहत असलेल्या वैशाली कैलास पाटील यांनी सैतवाल यांना फोन लावला. सैतवाल यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचं वैशाली यांनी पाहिलं होतं. त्यांनी हे सैतवाल यांना सांगितलं.
हेही वाचादुसऱ्या बायकोच्या मुद्द्यावरून झाला वाद आणि भावानेच केला भावाचा खून
चोरी झाल्याचा संशयही सैतवाल यांनी व्यक्त केला. सैतवाल लगोलग घरी आले. त्यांच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तुटलेला होता. किचनमधील डबे खाली पडलेले होते. सर्व खोल्यांमधील साहित्य अस्ताव्यस्त होते. बेडरूमचं कपाट उघडं होतं. त्यात मुलीच्या लग्नाचे 20 हजार रुपये, तब्बल 93 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, इतरही विविध चांदीचे दागिने, साड्या असा एकूण 1 लाख 58 हजार 600 रुपयांचा ऐवज होता. तो सगळा चोरट्यांनी लांबवला.
सैतवाल यांनी लगेचच पोलीस ठाणे गाठत चोरी झाल्याची फिर्याद नोंदवली. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.