मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलासाठी Amazon विरोधात उभा राहिला हा बाप; 4 महिन्यांपूर्वी लेकाने केली होती आत्महत्या

मुलासाठी Amazon विरोधात उभा राहिला हा बाप; 4 महिन्यांपूर्वी लेकाने केली होती आत्महत्या

मृत मुलाचे वडील त्याच्या आत्महत्येमागे अॅमेझॉन कंपनीला जबाबदार मानत आहे.

मृत मुलाचे वडील त्याच्या आत्महत्येमागे अॅमेझॉन कंपनीला जबाबदार मानत आहे.

मृत मुलाचे वडील त्याच्या आत्महत्येमागे अॅमेझॉन कंपनीला जबाबदार मानत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 25 नोव्हेंबर : Madhya Pradesh: मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये एका 18 वर्षीय तरुणाने अॅमेझॉनवरुन ऑनलाइन विष मागवलं आणि आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सर्वांनाच हेलावून टाकलं होतं. वडिलांच्या मागणीनंतर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलिसांना यासंदर्भात निर्देश दिले आणि अॅमेझॉन या इ-कॉमर्स कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल करणार आहेत.

मृत तरुणाचे वडील आपल्या तरुण मुलाच्या आत्महत्येनंतर अॅमेझॉनविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी चार महिन्यांपासून पोलिस आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे.

गृह मंत्री मिश्रा यांनी सांगितलं की, एका तरुणाने अॅमेझॉनवरुन ऑनलाइन विष मागितलं आणि आत्महत्या केली. यामुळे अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा आणि नोटीस पाठवून चौकशी करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे.

हे ही वाचा-Shocking!वडिलांनी मुलीला प्रेमाने सांगितलं शाळेत नको जाऊस, तिने असं काही केलं की

ते पुढे म्हणाले की, मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की, नोटीस मिळाल्यानंतरही अॅमेझॉनचे अधिकारी हजर झाले नाही तर त्यांनी पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली जावी. अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स साइटच्या माध्यमातून अनेक जणं विष आणि गांजा सारख्या अमली पदार्थांची ऑर्डर कसं काय करू शकतात? आम्ही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. राज्य सरकारतर्के इ-कॉमर्स साइटबाबत नियम तयार करून केंद्राला पाठवणार आहे, यामुळे ऑनलाइन विक्री-खरेदीवर अंकुश ठेवता येईल.

Koo App
इंदौर के युवा आदित्य वर्मा ने बीते दिनों ई-कॉमर्स कंपनी अमेजन से जहर मंगाकर आत्महत्या कर ली थी। बेटे की मौत से आहत पिता रंजीत और उनके परिवार ने आज मुझसे इंदौर में मुलाकात की। रंजीत जी मैं आपको न्याय दिलवाने का भरोसा दिलाता हूं। मैंने कंपनी के खिलाफ FIR दर्ज करने और अमेजन के अधिकारियों को तलब करने के निर्देश जारी कर दिए हैं। इतनी गंभीर घटना के आरोपी बख्शे नही जाएंगे। - Dr.Narottam Mishra (@drnarottammisra) 25 Nov 2021

मुलाच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील रंजीव वर्मा यांनी मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी फळ विकून घर चालविणाऱ्या रंजीत वर्मा यांनी 18 वर्षीय मुलाच्या आत्महत्येचा प्रकार सांगितला. मुलगा आदित्य वर्मा (18) याने जुलै महिन्यात ऑनलाइन ऑर्डर देऊन विष मागितलं होतं आणि ते खाऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणात अॅमेझॉन या कंपनीविरोधात कारवाईची मागणी वर्मा यांनी केली आहे.

First published:

Tags: Amazon, Crime news, Suicide