7 वर्षाच्या मुलीसमोर बापानं तडफडत सोडला जीव; राधानगरीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

7 वर्षाच्या मुलीसमोर बापानं तडफडत सोडला जीव; राधानगरीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील सिरसे गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 7 वर्षांच्या चिमूरडीसमोर तिच्या पित्यानं तडफडत प्राण (Father died in front of child) सोडला आहे.

  • Share this:

राधानगरी, 04 मे: कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील सिरसे गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका 7 वर्षांच्या चिमूरडीसमोर तिच्या पित्यानं तडफडत प्राण (Father died in front of child) सोडला आहे. 29 वर्षीय मृत तरुणाचं नाव रणजित हरिश टिपुगडे असून त्याला तुटलेल्या वीजवाहक तारेचा (Electric Shock) जबरदस्त धक्का बसला आहे. हा विजेचा धक्का इतका भयंकर होता की, त्याचा जागीच तडफडून मृत्यू (father death) झाला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून संतप्त ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रविवारी सायंकाळी राधानगरी तालुक्यातील सिरसे गाव परिसाला अवकाळी पावसानं झोडपून काढलं होतं. या पावसामुळे गावात अनेक ठिकाणी पडझड झाली होती. दरम्यान सिरसे गावातील रस्त्याशेजारी असणारी विद्युत प्रवाही तारही तुटून पाण्यात पडली होती. असं असताना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज प्रवाह खंडित केला नाही. सोमवारी सकाळी मृत टिपुगडे आपल्या जनावरांना वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होते.

यावेळी त्यांची सात वर्षांची मुलगी जीवनादेखील त्यांच्यासोबत होती. शेताकडे जात असताना टिपुगडे यांचा विद्युत वाहक तारेला स्पर्श झाला. यानंतर काही कळायच्या आत होत्याचं नव्हतं झालं. तारेला स्पर्श होताच रणजितनं आपल्या मुलीदेखतचं तडफडून जीव सोडला. सुदैवानं यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी क्षणार्धात मुलीला मागे ओढलं. त्यामुळे तिचा जीव वाचला आहे.

हे ही वाचा-बाळासहित 100 फूट उंच उडाला पाळणा, अंगावर काटा आणणारी दुर्देवी घटना

या हृदयद्रावक घटनेनंतर सिरसे गावातील ग्रामस्थानी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पण वीज कंपनीकडून मदत करण्यास आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. सोमवारी उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 4, 2021, 2:23 PM IST

ताज्या बातम्या