• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • भिवंडीत ज्वेलर्स दुकानात बुरखाधारी महिलांनी सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला, घटना CCTV मध्ये कैद

भिवंडीत ज्वेलर्स दुकानात बुरखाधारी महिलांनी सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला, घटना CCTV मध्ये कैद

हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाहा VIDEO

  • Share this:
मुंबई, 10 नोव्हेंबर : भिवंडी (Bhiwandi News) शहरातील मुख्य बाजारपेठेतील पारनाका येथील मानसी ज्वेलर्स या सोनेचांदी विक्रीच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी सोन्याचे नाकातील, कानातील पाहण्याचा बहाणा करीत असताना चोरी (Stole gold jewelry) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बुरखाधारी महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन दागिने दाखवण्यास सांगितले. तेथील कर्मचाऱ्यांनी नाकातील नथ, कानातील सोन्याचे टॉप असलेले लाल आणि निळ्या रंगाचे फोल्डर समोर ठेवले होते. (In Bhiwandi women stole gold jewelery from a jewelers shop video viral) हे ही वाचा-कारमध्ये हवा भरणं पडलं एक लाखाला; हिंगोलीतील शिक्षकासोबत घडला भलताच प्रकार त्यावेळी नजर चुकवून त्यापैकी एका महिलेने दोन लाख 71 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले, नाकातली नथ असे तब्बल 90 नग असलेला लाल कलरचा फोल्डर हातचलाखीने चोरला. या महिलेने चोरलाला हा फोल्डर बुरख्यात ठेवून बाहेर नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दुकान मालक संजय ओस्तवाल यांच्या नजरेत ही बाब आल्याने कर्मचारी प्रदीप सोनी याने आज निजामपूरा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात बुरखाधारी महिलां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या महिलांचा शोध घेत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published: