• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • खासगी बसमध्ये जोडप्यासोबत घडलेल्या प्रकाराचा VIDEO आला समोर, अर्धनग्न अवस्थेत तरुणीला केलं शूट

खासगी बसमध्ये जोडप्यासोबत घडलेल्या प्रकाराचा VIDEO आला समोर, अर्धनग्न अवस्थेत तरुणीला केलं शूट

धक्कादायक बाब म्हणजे याचा VIDEO शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

 • Share this:

  इंदूर, 23 जून : रीवा पोलिसांनी प्रेमी युगुलांना अत्यंत लज्जास्पद वागणूक दिली आहे. पोलिसांना एका बसमध्ये प्रेमी युगूल संदिग्ध परिस्थिती सापडले. त्यानंतर पोलिसांनी तरुणासोबत असभ्य वागणूक दिली. इतकच नाही तर तरुणीला अर्धनग्न अवस्थेत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. याचा एक व्हिडीओ बस संचालकाने मोबाइलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना सोमवारी रात्री घडली. ASP मऊगंज विजय डाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने दावा केला आहे की, ती रीवाकडून हनुमनाच्या दिशेने गावी जात होती. रात्र झाल्यानंतर शाहपुर पोलीस ठाणे हद्दीतील भागात बस स्टँडमध्ये आपल्या प्रियकरासोबत थांबली होती. यानंतर प्रियकराने एका बसमधील स्टाफला याबद्दल विचारलं. रात्र झाल्या कारणाने आजची रात्र बसमध्ये झोपू शकतो का असं प्रेमी युगूलाने स्टाफला विचारलं. तरुणीच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं. यानंतर बस स्टाफने याची परवानगी दिली. यानंतर प्रेयसी-प्रियकर बसमध्येच झोपले. दरम्यान एका अन्य स्टाफने या बाबत मालकाला माहिती दिली, यानंतर नगर सैनिकासोबत पोहोचलेले 100 च्या जवानाने तरुणीसोबत गैरव्यवहार केला. अपशब्द उच्चारत तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. इतकच नाही, पीडितेला संपूर्ण कपडेदेखील घालू दिले नाही. हे ही वाचा-सौंदर्याच्या जाळ्यात! नेते, बिजनेसमॅन, अधिकारीही Sextortionists च्या निशाण्यावर पोलीस ठाण्याच्या महिला प्रभारीवर कारवाईचे संकेत सांगितलं जात आहे की, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. असा दावा केला जात आहे की, ASP आणि SDOP ला सूचना न देता शाहपूर ठाण्याचे प्रभारी, उप निरीक्षक श्वेता मोर्याने हे प्रकरण लपवून ठेवले. या बाबत सवाल उपस्थित केले जात आहे. आरोपी बस मालकावर व्हिडीओ व्हायरल करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

  Published by:Meenal Gangurde
  First published: