अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; प्रियकरासह महिलेला अटक

अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; प्रियकरासह महिलेला अटक

Crime in Beed: गेवराई तालुक्याच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींना गजाआड केलं आहे.

  • Share this:

बीड, 04 मे: गेवराई तालुक्याच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या मृताच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती घातपाताचे व्रण होते. त्यामुळे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींना गजाआड केलं आहे. संबंधित हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची उकल पोलिसांनी केली आहे.

संबंधित 32 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण असून तो गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी आहे. ज्ञानेश्वरचा मृतदेह शनिवारी राजापूर शिवारातील एका शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या, तर गळ्याभोवती फास दिल्याचे व्रणही होते. या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती उघड झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वरला दोन बायक्या होत्या. यातील पहिल्या बायकोचे आरोपी नाना अप्पा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात जवळीक वाढली होती. पण मृत ज्ञानेश्वर त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं ज्ञानेश्वरच्या हत्येचा कट रचला आणि त्याची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी ज्ञानेश्वरचा मृतदेह गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात नेवून टाकला.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात हत्या केल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 4, 2021, 8:41 AM IST

ताज्या बातम्या