मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच काढला काटा!

शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध, अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईनेच काढला काटा!

येथे संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

येथे संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

तात्या कदमसोबत मुक्ताबाईचे गेल्या 5 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मुक्ताबाईचा पती सुभाष हा दोन वर्षांपासून अचानक गायब झाला होता.

माढा, 28 डिसेंबर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढ्यात काही दिवसांपूर्वी एका 28 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी अवघ्या चार दिवसात हत्येचा उलगडा केला आहे. अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे आईनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने मुलाची हत्या केल्याचे तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई सुभाष जाधव असं आरोपी महिलेचं नाव आहे. आरोपी मुक्ताबाईचे तात्यासाहेब कदम याच्यासोबत प्रेमसंबंध होते. यातून दोघांनी अनैतिक संबंध प्रस्तापित केले होते. पण, त्यांच्या या अनैतिक प्रेमसंबंधाला 22 वर्षीय मुलगा सिद्धेश्वर सुभाष जाधव हा अडथळा ठरत होता. त्यामुळे सिद्धेश्वरची हत्या करून मृतदेह हा परितेवाडी हद्दीत फेकून देण्यात आला होता.

अन् 'तो' यशाचा टर्निंग पॉईंट ठरला! रतन टाटांनी असा घेतला होता अपमानाचा बदला

24 डिसेंबर रोजी गावातील काही तरुण हे माळावर असलेल्या चारीत गेले होते. तेव्हा त्यांना सिद्धेश्वरचा मृतदेह आढळून आला होता.  त्याच्या मानेवर आणि अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. तरुणांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि सिद्धेश्वरचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

22 वर्षीय सिद्धेश्वरची हत्या कुणी केली असावी, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. गावातील लोकांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सिद्धेश्वरच्या लहान भाऊ बालाजीकडे विचारपूस केली. त्यावेळी आपली आई मुक्ताबाई हीचे शेजारी राहणाऱ्या तात्या कदम याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्याला सिद्धेश्वरने विरोध केला होता. तात्या कदमचा आमच्या जमिनीवर डोळा होता. त्याने आईची सही घेऊन जमिनी हडपली होती, सिद्धेश्वरने त्याला विरोध केला होता. या वादातूनच सिद्धेश्वरची हत्या केली असावी असा संशय बालाजीने व्यक्त केला. बालाजीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्ताबाईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातील मुक्ताबाईने उडवाउडवीची उत्तर दिली. पण पोलिसांनी बळाचा वापर केला असता मुक्ताबाईने आपल्या मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.

तरुण-तरुणी रात्री गाडीत पित होते दारु, अचानक भलतंच घडलं!

आरोपी तात्या कदम आणि मुक्ताबाई हे शेतात शेजारी राहतात. तात्या कदमसोबत मुक्ताबाईचे गेल्या 5 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मुक्ताबाईचा पती सुभाष हा दोन वर्षांपासून अचानक गायब झाला होता. त्यानंतर आरोपी तात्या कदम याने मुक्ताबाईची एक एकर जमीन ही आपल्या नावावर करून घेतली होती. त्यानंतर तिला शेतातच पत्राचे शेड उभे करून दिले होते. कदम याने आपल्या पत्नी आणि मुलाबाळांनाही घरातून बाहेर हाकलून दिले होते. मुलगा सिद्धेश्वरने याला कडाडून विरोध केला होता. यातून बऱ्याच वेळा सिद्धेश्वर आणि तात्या कदममध्ये वाद आणि भांडणेही झाली होती. या वादातून सिद्धेश्वरची हत्या करण्यात आली. आरोपी मुक्ताबाईला पोलिसांनी अटक केली असून तात्या कदम हा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

First published:

Tags: खून, हत्या