मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

इमाम साहेबांना महागात पडतेय Social Media वरील मैत्री, न्यूड Video दाखवून तरुणी करतेय ब्लॅकमेल

इमाम साहेबांना महागात पडतेय Social Media वरील मैत्री, न्यूड Video दाखवून तरुणी करतेय ब्लॅकमेल

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एक इमाम (Imam) एका ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एक इमाम (Imam) एका ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एक इमाम (Imam) एका ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

  • Published by:  desk news

पटना, 12 ऑगस्ट : मोठ्या शहरांमधील ऑनलाईन ब्लॅकमेलिंगचे (online blackmailing) प्रकार आता बिहारमध्येदेखील (Bihar) सुरु झाले आहेत. एखाद्या मुलीच्या अकाउंटवरून सोशल मीडियावर (social media) फ्रेंड रिक्वेस्ट (friend request) येणं, ती स्विकारल्यानंतर व्हॉट्सअप नंबरची (whats app number) मागणी करणं, मग व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल (video call) करून मुलीनं नग्न अवस्थेत बातचित करणं आणि त्या कॉलचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळणं असे प्रकार वाढत चालले आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूरमधील एक इमाम (Imam) सध्या अशाच एका ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण

साहेबगंज परिरातील एका मशिदीच्या इमामांनी पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. एका तरुणीनं इमामांशी सोशल मीडियावरून मैत्री केली. त्यानंतर चॅटवरून व्हॉट्सअप नंबर मागितला. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून इमामांचे आक्षेपार्ह फोटो घेतले आणि ते व्हायरल करण्याची धमकी आपल्याला दिली जात असल्याचं इमाम म्हणतात. त्यांचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करून त्यावरून काही आक्षेपार्ह फोटो अपलोडही केले गेल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

या प्रकरणाचा अधिकृत तपास लवकरच सुरू होईल आणि त्याबाबतचे अधिक तपशील मिळू शकतील, असं पोलिसांनी म्हटल्याची बातमी 'दैनिक भास्कर'नं दिली आहे. मात्र सोशल मीडियावरून अशी मैत्री करणे आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

पटनामध्येही घडली होती अशीच घटना

काही दिवसांपूर्वी पटनामध्येही अशीच एक घटना उघड झाली होती. या तरुणानं पोलीस तक्रारच दाखल न केल्यामुळे त्याचा तपास होऊ शकला नव्हता. मात्र या तरुणाशी एका अनोळखी तरुणीनं सोशल मीडिया अकाऊंटवरून मैत्री केली आणि त्यानंतर व्हॉट्सअप कॉल करून त्यात तिने स्वतःचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दाखवला. त्यानंतर कॉल कट झाला. थोड्या वेळाने तिचा नग्न व्हिडिओ आणि ते पाहत असलेला तरुण असा व्हिडिओ तिने या तरुणाला पाठवला. या तरुणाने स्वतःची लाज वाचवण्यासाठी तरुणीला 10 हजार रुपये दिल्याचीही माहिती आहे.

नागरिकांनी अशा प्रकारे अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना आणि त्यांना स्वतःचा नंबर देताना सावध राहावं, अशा सूचना सायबर पोलिसांनी केल्या आहेत.

First published:

Tags: Bihar, Cyber crime, Online crime