भुवनेश्वर, 26 नोव्हेंबर : कोरोना महामारीदरम्यान (Coronavirus) लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) ओडिशाच्या वन अधिकाऱ्याचा प्रताप पाहून तपास अधिकाऱ्यांना धक्काच बसला आहे. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले होते, यादरम्यान पर्यटन सेवाही बंद होत्या. मात्र यादरम्यान हे वन अधिकारी चार्टर्ड प्लेनने प्रवास करीत होते. सांगितलं जात आहे की हे वन अधिकारी आपल्या कुटुंबासमवेत एकदा नव्हे तर 20 वेळा चार्टर्ड प्लेनमधून पटना, मुंबई, दिल्ली आणि पुणे येथे गेले होते. वन अधिकाऱ्याच्या या भेटीबाबत एका केंद्रीय एजन्सीने ओडिशा सरकारला माहिती दिली आहे.
यानंतर बुधवारी भुवनेश्वर, मुंबई, पुणे, बिहार आणि राजस्थान येथे एकत्रितपणे छापेमारी करण्यात आली. 58 वर्षीय वन विभागातील अॅडिशनल प्रिन्सिंपल चीफ कन्जर्वेटर अभयकांत पाठक यांच्या संपत्तीचा खुलासा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. पाठक हे 1987 बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. एका चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाठक यांच्या भुवनेश्वर स्थित क्वार्टर्स आणि कार्यालयात सर्च ऑपरेशन चालविण्यात आलं.
हे ही वाचा-26/11 Terror: 'आम्ही हे विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध
मुलासाठी ठेवले होते बॉडीगार्ड
याशिवाय त्याच्या काही नातेवाईकांच्या घरातही छापेमारी करण्यात आली. छापा टाकताना मोठ्या प्रमाणात रोकड व कागदपत्रे सापडली आहेत. सर्व ठिकाणच्या छापेमारीनंतर त्यांच्या मालमत्तेचे एकूण मूल्य समजू शकेल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी दरम्यान असे आढळले की पाठक यांनी आपला मुलगा आणि स्वत: साठी चार खासगी बॉडीगार्ड ठेवले होते. प्रत्येक बॉडीगार्डला दरमहा 50 हजार रुपये पगार दिला जातो.
ड्रायव्हरच्या घरातून मिळाली कॅश
याशिवाय त्यांनी पुण्यात एक फार्म हाऊस भाड्याने घेतला होता. त्याचं प्रत्येक महिन्याचं भाडं 5 लाख रुपये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीदरम्यान पाठक यांच्या भाच्याकडून येथील अधिकाऱ्यांनी 50 लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे. याशिवाय पुरी जिल्ह्यातील पिपली भागात राहाणाऱ्या पाठक यांच्या ड्रायव्हरच्या घरातूनही मोठी कॅश जप्त करण्यात आली आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी पाठक आणि त्यांच कुटुंब वापरल असलेल्या 5 महागड्या गाड्याही जप्त केल्या आहेत.