लग्न करायचे तर 2 लाख दे, प्रेयसीची मागणी प्रियकराच्या जीवावर बेतली

लग्न करायचे तर 2 लाख दे, प्रेयसीची मागणी प्रियकराच्या जीवावर बेतली

दोघेही एकाच दुकानात काम करत होते. किरणच्या पतीचे निधन झाले असून तिला 2 मुलं आहे.

  • Share this:

नागपूर, 22 डिसेंबर : 'माझ्याशी लग्न करायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील', अशी मागणी केल्यामुळे एका प्रियकराने आत्महत्या (committed suicide) केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. धक्कादायक म्हणजे, लग्न टाळण्यासाठी प्रेयसीने मुद्दाम अशी अट घातली होती.

नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. रोशन भास्कर खिरे (वय 28) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.

Jammu kashmir : कुलगाममध्ये लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांचं आत्मसमर्पण

मृत रोशन खिरे यांचं किरण नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही एकाच दुकानात काम करत होते. किरणच्या पतीचे निधन झाले असून तिला 2 मुलं आहे. रोशनसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्याने लग्नाची मागणी घातली होती. पण दोन मुलं असल्यामुळे किरणने लग्न करण्यास टाळात होती.

महाराष्ट्र हाय अलर्टवर, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीने बैठक

किरणने रोशनची समजूत देखील काढली होती. पण रोशन सतत लग्नाचाच विषय काढत होता. त्यामुळे रोशनला टाळण्यासाठी माझ्यासोबत जर लग्न करायचे असेल तर 2 लाख रुपये द्यावे लागतील अशी अटच घातली. किरणने अशी अट घातल्यामुळे रोशनला जिव्हारी लागले होते. दुकानात काम करत असल्यामुळे रोशनकडे तेवढी रक्कम सुद्धा नव्हती.

मायभूमीत अवतरणार स्विझर्लंडसारखा नजारा, स्थानिकांनासाठी मोठी रोजगाराची संधी

त्यामुळे किरणशिवाय जगणे असह्य झाल्यामुळे रोशनने विष प्राशन केले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारदम्यान रोशनचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी रोशनने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती.  पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 22, 2020, 8:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या