रायगड, 15 जानेवारी : छत्तीसगडमधील रायगड (Raigarh) मधील एका स्टोअर संचालकाचा एका तरुणीवर जीव जडला. तो तिच्यावर पुरता फिदा झाला. बरं तो इतक्यावरच थांबला नाही तर त्यांने तरुणीच्या मोबाइलवर फोन करुन आपल्या प्रेमाची कबुली दिली. जो व्यक्ती तरुणीला त्रास देत होता तो, विवाहित (Married Man) होता आणि दोन मुलांचा बाप होता. यानंतरही या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या नाहीत. तरुणीने आधी त्या व्यक्तीला समजावलं, मात्र तरीही तो सतत तिला मेसेज पाठवित होता. शेवटी वैतागलेल्या तरुणीने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.
तरुणीवर जीव जडल्यानंतर आपण विवाहित असल्याचंही हा व्यक्ती विसरला. त्याने तिचा मोबाइल नंबर शोधून काढला व वारंवार तिला मेसेज करुन त्रास देत होता. शेवटी वैतागून तरुणीने खरसिया पोलीस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. सांगितलं जात आहे की तरुणीने त्याला एफआयआरची कॉफी मेसेज केली, जे पाहून त्याला धक्काच बसला.
हे ही वाचा-'आमदार प्रताप सरनाईकांच्या वाढदिवशी झाली होती भेट'; अखेर रेणू शर्मानं सोडलं मौन
तरुणीने केली एफआयआर
सांगितलं जात आहे की, 35 वर्षीय संदीप अग्रवाल डभरा रोड स्थित एक दुकान चालवित होता. आरोप आहे की तो गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने 22 वर्षीय तरुणीच्या मोबाइलवर मेसेज पाठवित होता. आरोपी संदीपने तिला मेसेज करुन लिहिलं की, तुम्ही खूप सुंदर दिसता. मला तुमच्यासोबत मैत्री करायची आहे. तरुणीने त्याला त्याच्या वयाची आठवण करुन दिली व थोडीतरी लाज बाळगण्यास सांगितलं. अनेकदा नकार दिल्यानंतरही व्यक्ती ऐकत नव्हता. शेवटी तरुणीच्या सूचनेवर आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपी व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news