मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हैदराबाद ऑनर किलिंग: पतीचे ते शब्द ठरले शेवटचे; मुस्लीम पत्नीने सांगितला हत्येचा थरार

हैदराबाद ऑनर किलिंग: पतीचे ते शब्द ठरले शेवटचे; मुस्लीम पत्नीने सांगितला हत्येचा थरार

Hyderabad Murder: सुलताना म्हणाली, लग्न करायच्या आधी असं काही होऊ शकेल याची कल्पना आम्हाला होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून मी त्याला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर म्हणून सांगत होते

Hyderabad Murder: सुलताना म्हणाली, लग्न करायच्या आधी असं काही होऊ शकेल याची कल्पना आम्हाला होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून मी त्याला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर म्हणून सांगत होते

Hyderabad Murder: सुलताना म्हणाली, लग्न करायच्या आधी असं काही होऊ शकेल याची कल्पना आम्हाला होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून मी त्याला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर म्हणून सांगत होते

हैदराबाद 06 मे : हैदराबादच्या रस्त्यावर बुधवारी (4 मे 2022) नागराजू नावाच्या एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आपल्या भावाने त्याच्या मित्रांसोबत मिळून आपल्या पतीची हत्या (Hyderabad Murder) केल्याचा आरोप नागराजूच्या पत्नीने केला आहे. नागराजू दलित होता आणि त्याची पत्नी अशरीन सुलताना ही मुस्लीम आहे. त्यामुळे सुलतानाच्या घरच्यांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण ऑनर किलिंग (Hyderabad honour killing) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सईद अशरीन सुलताना (Syed Ashrin Sultana) उर्फ पल्लवी आणि नागराजू (Nagaraju) यांचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. अशरीनच्या घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न केलं. त्यानंतर बुधवारी हे दोघे हैदराबादमधील सरूरनगर परिसरातून (Hyderabad Suroornagar murder) जात असताना अचानक एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी नागराजूला या लोकांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर चाकू भोकसून भररस्त्यात त्याची हत्या करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Hyderabad murder video) कैद झाला. तसंच, आजूबाजूच्या लोकांनी मोबाईलवर शूट केलेले व्हिडिओदेखील काही वेळातच व्हायरल झाले.

मुस्लीम तरुणीशी प्रेमविवाह, भररस्त्यात लोकांच्या देखत तरुणाचा भयंकर शेवट

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की हल्लेखोरांनी नागराजूला धक्का देत जमिनीवर पाडलं. त्यावेळी सुलतानाने या हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हल्लेखोरांनी तिलाही बाजूला ढकलून दिलं आणि नागराजूला मारहाण सुरू केली. सुलतानाने पुन्हा मध्ये पडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिची ताकद या हल्लेखोरांसमोर कमी पडली. ती नागराजूला (Hyderabad Dalit man murder) न मारण्याची याचना त्यांच्यासमोर करत राहिली, मात्र हल्लेखोरांनी नागराजूची हत्या केली. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बहिणीने केला भावावर आरोप

“ते माझ्या नवऱ्याला डोक्यावर मारत होते.. माझे पती म्हणाले मला मारू नका, प्लिज मला मारू नका.. का मारताय मला? आणि हेच त्यांचे शेवटचे शब्द ठरले..” असं सुलतानाने इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. याच मुलाखतीत तिने आपल्या भावावर हत्येचा आरोप (Hyderabad Dalit man honour killing) केला आहे. “मी हल्लेखोरांना मागे ढकलत होते तेव्हा माझ्या भावाचा चेहरा मला दिसला. कॅमेऱ्यामध्येही तो स्पष्टपणे दिसून येत आहे. हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला नाही केला, मला केवळ ते बाजूला ढकलत होते.” असं सुलताना म्हणाली.

पहिलं लग्न 2003 मध्ये, मग 2013, 2016 आणि शेवटी 2021; नागपूरातील लुटारू नवरीचा प्रताप पाहून पोलिसही हादरले!

असं होणार याची कल्पना होती

सुलताना म्हणाली, “लग्न करायच्या आधी असं काही होऊ शकेल याची कल्पना आम्हाला होती. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून मी त्याला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर म्हणून सांगत होते. माझ्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण व्हावा असं मला वाटत नव्हतं. माझ्या कुटुंबीयांनी आमच्या नात्याबद्दल समजल्यानंतर त्याला एकदा जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, त्याला फरक पडला नाही. तो मला म्हणाला होता की मी तुझ्यासाठी मरायलाही तयार आहे.”

जमावाची बघ्याची भूमिका

दिवसाढवळ्या सगळ्यांसमोर ही हत्या झाली. यावेळी जर आजूबाजूच्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. यावेळी लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला असता तर आज नागराजू जिवंत असता; असं सुलताना मुलाखतीत म्हणाली. केवळ आम्हालाच नाही, तर जगात कुठेही असं काही होत असेल तर लोकांनी मदत करायला हवी, असं ती म्हणाली.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. मुलीचे कुटुंबीयच मुख्य आरोपी असल्याचा संशय आहे. यासोबतच आणखी कोण कोण यात सामील होतं याबाबत तपास सुरू आहे. आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे, असं एलबी नगरचे एसीपी श्रीधर रेड्डी यांनी सांगितले.

First published:

Tags: Crime, Hyderabad, Murder