हैदराबाद Encounter : आरोपीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास पत्नीचा नकार, केली मोठी मागणी

हैदराबाद Encounter : आरोपीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास पत्नीचा नकार, केली मोठी मागणी

आपल्या पतीचा दफनविधी करण्यास नकार देत तिने एन्काउंटरविषयी नाराजी व्यक्त केली. "किती लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची अशी शिक्षा मिळते, असा सवाल करत तिने एक अजब मागणी केली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 7 डिसेंबर : हैदराबादच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला निर्घृणपणे जाळण्याचा आरोप असलेल्या चौघांचा तेलंगण पोलिसांनी शुक्रवारी एन्काउंटर केला. आता या एन्काउंटरप्रकरणी न्यायालयात याचिका झालेली आहे. पण त्याच वेळी या चार मृत आरोपींपैकी एकाच्या पत्नीने अजब दावा केला आहे. आपल्या पतीचा दफनविधी करण्यास नकार देत तिने एन्काउंटरविषयी नाराजी व्यक्त केली.

"किती लोकांना त्यांनी केलेल्या चुकीची अशी शिक्षा मिळते, असा सवाल करत तिने म्हटलंय की, "या आरोपींना ज्या पद्धतीने गोळी मारण्यात आली, तशी जेलमध्ये असलेल्या अन्य आरोपींनाही मारण्यात यावी. तोपर्यंत आम्ही शवाचा दफनविधी करणार नाही."

तेलंगणच्या नारायणपेट जिल्ह्यातल्या आपल्या गावात आरोपी  चेन्ना केशवुलूची पत्नी इतर काही गावकऱ्यांसमवेत धरणे धरून बसली आहे. ती गर्भवती आहे. आपल्या पतीवर अन्याय झाल्याचा तिने आरोप केला आहे.

संबंधित VIDEO : हैदराबाद Encounter वर सरन्यायाधीशांचं मोठं विधान!

"माझ्या पतीला काही होणार नाही. तो परत येईल, असं मला सांगण्यात आलं होतं. आता मी काय करू? माझ्या पतीला गोळ्या घातल्या त्या जागी मलाही न्या आणि मारून टाका", असं ती म्हणते.

चारही आरोपींचं एन्काऊंटर

हैदराबादच्या हद्दीत शमशाबाद इथे 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार आणि खून करण्यात सामील असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी सकाळी सायबराबाद पोलिसांनी एका चकमकीत ठार केलं. पोलिसांच्या अहवालानुसार, मोहम्मद अली उर्फ मोहम्मद आरिफ, जोल्लू शिवा, जोल्लू नवीन कुमार, आणि चिंताकुंता चेन्ना केशवुलू या चार आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करून चौघांनी ठार मारलं.

9 तारखेला याचिकेवर सुनावणी

दरम्यान, देशभर गाजत असलेल्या हैदराबाद ENCOUNTER प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे पोलिसांना आता सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी ही 9 डिसेंबरला होणार असून तोपर्यंत आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार करू नका असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

------------------------

अन्य बातम्या

'जय महाराष्ट्र' म्हणत एकनाथ खडसेंनी दिला 'वेगळा विचार' करण्याचा भाजपला इशारा

दिव्यांग महिलेच्या खून प्रकरणाचा लागला छडा, आरोपीचे नाव ऐकून पोलीसही गोंधळ!

दत्तक मुलीनेच काढला बापाचा काटा, गुप्तांगासह अवयव कापून फेकले समुद्रात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 07:16 PM IST

ताज्या बातम्या