हैदराबाद गँगरेप हत्या : 'मदतीसाठी 100 नंबर फिरवला होता पण...' कुटुंबीयांनी उघड केला चीड आणणारा अनुभव

हैदराबाद गँगरेप हत्या : 'मदतीसाठी 100 नंबर फिरवला होता पण...' कुटुंबीयांनी उघड केला चीड आणणारा अनुभव

तिच्या घरच्यांनी 100 नंबर फिरवून पोलिसांची मदत मागितली होती. पण ज्या कर्मचाऱ्यानं त्यांचा फोन उचलला त्यांनी आधी त्यांच्याकडे आधार क्रमांकाची मागणी केली. पोलीस ठाण्यात पीडितेच्या कुटुंबीयांना आलेला अनुभव...

  • Share this:

हैदराबाद, 3 डिसेंबर :  हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. संसदेतसुद्धा या घटनेचे पडसाद उमटले. पण त्याच वेळी एका स्थानिक वृत्तवाहिनीने पीडितेच्या कुटुंबीयांशी बातचीत करताना एका वेगळ्याच गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.

पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या तिच्या बहिणीला सांगण्यात आलं की, तिने 100 नंबर फिरवून मदत मागितली असती, तर कदाचित ती वाचली असती. पण पीडितेच्या बहिणीने यावर सांगितलेला अनुभव आणखी चीड आणणारा आहे. आपली बहीण बेपत्ता आहे. तिचा शोध घेऊनही ती सापडत नाही हे लक्षात येताच तिच्या घरच्यांनी 100 नंबर फिरवून पोलिसांची मदत मागितली होती. पण ज्या कर्मचाऱ्यानं त्यांचा फोन उचलला त्यांनी आधी त्यांच्याकडे आधार क्रमांकाची मागणी केली. आधी आधार नंबर सांगा आणि मग तुमची तक्रार नोंदवून घेतो, असं उत्तर त्यांना मिळालं.

पोलिसांची टाळाटाळ

ज्या वेळी पीडितेचे नातेवाईक तिच्या बेपत्ता असण्याची तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी प्रथम तुमची मुलगी कुणाबरोबर तरी फिरायला गेली असेल, असं सांगून टाळाटाळ करण्यात आली. मुलीबरोबर झालेल्या शेवटच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगही तिच्या वडिलांना पोलिसांना ऐकवलं.

वाचा - पुण्यात TCSच्या कर्मचाऱ्याची ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

तरीही पोलीस विश्वास ठेवायला तयार नव्हते. बरीच टाळाटाळ केल्यानंतर अखेर तरुण मुलगी हरवल्याची वडिलांची तक्रार नोंदवून घेण्यात आली.

दरम्यान 25 वर्षांच्या या पीडित पशुवैद्यक डॉक्टर तरुणीचं नाव काही सोशल मीडिया साइट्स आणि काही वृत्तस्थांनी जाहीर केलं. त्यांना नोटिस देण्यात आली आहे.

बहिणीशी शेवटचं संभाषण

या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे.

वाचा - बाप नावाला कलंक; झोपेच्या गोळ्या खाऊ घालून पोटच्या 16 वर्षीय मुलीवरच दुष्कर्म

महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.

-------------------------

अन्य बातम्या

अमेरिकेतलं शेफचं काम सोडून सुरू केला नवा बिझनेस, उभारली 26 कोटींची कंपनी

आता 3 दिवसांतच मोबाइल नंबर होणार पोर्ट, या तारखेपासून नवा नियम लागू

भाजप सोडणार का? 'त्या' फेसबुक पोस्टबद्दल पंकजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

बेपर्वाईचा कहर! शालेय आहारात दिलेल्या खिचडीत मेलेला उंदीर VIDEO VIRAL

First published: December 3, 2019, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading