'हायटेक' फंडे वापरुन करायचा ब्लॅकमेल, खंडणीची मागणी करणाऱ्या सुशिक्षित तरुणाला अटक

'हायटेक' फंडे वापरुन करायचा ब्लॅकमेल, खंडणीची मागणी करणाऱ्या सुशिक्षित तरुणाला अटक

‘आरोपीनं फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी व्हर्च्युअल फोन नंबरच्या (Virtual phone number) साह्यानं व्हॉट्सअप अकाऊंट तयार केलं होतं,’ अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) दिली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 24 डिसेंबर : शिक्षणाचा वापर प्रगतीसाठी न करता गुन्हेगारीसाठी करणारी उदाहरणं कमी नाहीत. इंटरनेटमुळे जग जवळ आलं, पण त्याचबरोबर या सुविधांचा वापर हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींकडूनही मोठ्या प्रमाणात होत आहे. बनावट ई मेल, अकाऊंट हॅकिंग, खोट्या ऑफर्स यासारख्या अनेक माध्यमातून झालेल्या गुन्ह्यांची संख्या अलिकडच्या काळात वाढत आहे. तंत्रज्ञानातील हायटेक फंडे वापरुन खंडणीची मागणी करणाऱ्या  एका 21 वर्षांच्या बीटेकच्या (B Tech) विद्यार्थ्याला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे.

हैदराबादच्या (Hyderabad)  सायबर क्राईम पथकानं केलेल्या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव ए. भरत कुमार असं आहे. त्याला राचकोंडा परिसरातून अटक करण्यात आली आहे.

काय होती पद्धत?

भरतला एका जाहिरातीच्या वेबसाईटवर पीडित महिलेचा फोन नंबर सापडला होता. त्यानंतर तो वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचा पासवर्ड म्हणून वापर करुन पीडित महिलेच्या गूगल अकाऊंटमध्ये लॉग इन करत असे. पीडित महिलेचे फोटो डाऊनलोड करुन तिला ब्लॅकमेलिंग करणं हे भरतच्या गुन्ह्याचे स्वरुप होते.

‘आरोपीनं फक्त ब्लॅकमेलिंग करण्यासाठी व्हर्च्युअल फोन नंबरच्या (Virtual phone number) साह्यानं व्हॉट्सअप अकाऊंट तयार केलं होतं,’ अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे.

(हे वाचा-धक्कादायक! पुण्यातल्या पर्वतीवर भेटायला बोलावलं आणि तरुणीवर केला बलात्कार)

भरतनं एका किराणा दुकानातून केलेल्या खरेदीनंतर QR कोड पाठवून पीडित महिलेकडं 10 हजारांची मागणी केली होती,  अशी माहिती देखील पोलीस तपासामधून समोर आली आहे. त्यानं आणखी किती जणांना आजवर ब्लॅकमेलिंग केलं आहे, तसंत त्याला या गुन्ह्यांमध्ये कुणाची मदत मिळत होती का? या या प्रश्नाचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 24, 2020, 11:20 AM IST

ताज्या बातम्या