थरार...संशयी नवऱ्याने केली पत्नी आणि दोन चिमुकल्यांची हत्या

थरार...संशयी नवऱ्याने केली पत्नी आणि दोन चिमुकल्यांची हत्या

या खळबळजनक घटनेनं दहिवली गाव हादरून गेलं असून या कुटुंबाला ओळखणाऱ्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.

  • Share this:

मोहन जाधव,रायगड 7 नोव्हेंबर : संशयाने विनाश होतो असं म्हणतात. त्याचा अनुभव माणगाव तालुक्यात आला. एका संशयी नवऱ्याने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडालीय. ही धक्कादायक घटना माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली आहे. संतोष शिंदे असं आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केलीय. पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत असून संतोषच्या चौकशीतून नेमकं कारण शोधून काढू असा दावा पोलिसांनी केलाय. या खळबळजनक घटनेनं दहिवली गाव हादरून गेलं असून या कुटुंबाला ओळखणाऱ्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.

पुण्यात हॉटेलच्या लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा.. मुलींचे केले चित्रिकरण

संतोष शिंदे हा पत्नी सुहानी (36) आणि दोन मुलांसह दहिवली गावात काही वर्षांपासून राहत होता. छोटी मोठी काम करून तो आपल्या कुटुंबाची उपजिविका चालवत असे. संतोष शिंदे हा संशयी होता. त्यामुळे त्याचं आणि त्याची पत्नी सुहानाचं भांडण होत असे. त्यांचं कायम भांडण होत असल्याने त्यांच्यात कायम तणावाचं वातावरण होतं. या भांडणाची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनाही होती.

जिल्हा रुग्णालयाच्या छतावर सुरु होते 'हे' कृत्य, आक्षेपार्ह अवस्थेत सापडली महिला

वारंवार होणाऱ्या या भांडणामुळे संतोष हा आणखीच संशयी बनता त्यांचं आणि त्याच्या पत्नीची टोकाची भांडणं होऊ लागली. घटनेच्या दिवशीही त्याचं आणि पत्नीचं कडाक्याचं भांडण झालं होतं. रात्री पत्नी आणि मुलं झोपल्यावर त्याने रागाच्या भरात नायलॉनच्या दोरीने आधीचा पत्नीचा गळा आवळला आणि नंतर दोन मुलांचीही गळा आवळून हत्या केली. पवन शिंदे (5) आणि संचित शिंदे (2) अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. किरकोळ वादातून संतोषने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या