Home /News /crime /

लग्नाच्या 5 वर्षांनंतरही पतीचा शारीरिक संबंधांसाठी नकार; व्हॉट्सअॅप चॅट पाहून पत्नी हादरली

लग्नाच्या 5 वर्षांनंतरही पतीचा शारीरिक संबंधांसाठी नकार; व्हॉट्सअॅप चॅट पाहून पत्नी हादरली

या व्हॉट्सअॅप चॅटमुळे गेल्या 5 वर्षांपासून जो त्रास पत्नी सहन करीत होती, त्याबाबत मोठा खुलासा झाला आहे

    सुरत, 16 नोव्हेंबर : गुजरातमधील (Gujrat) एका शहरातील पती-पत्नीमधील (Husband and wife) एक फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या पाच वर्षांपर्यंत महिला हा त्रास सहन करीत होती. गेल्या पाच वर्षांत पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवलेच नाही. अनेकवेळा तो काहीही कारण देत विषय टाळत होता. अखेर या प्रकरणाचा छडा लागला असून पत्नीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरतच्या गोपीपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेचे 2017 मध्ये नवापुरात राहणाऱ्या तरुणाशी लग्न झाले होते. वधूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने वडिलांनी शक्य त्या पद्धतीने मुलीचं लग्न लावून दिलं. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून हुंड्यासाठी सासरकडून त्रास देण्यास सुरुवात झाली. महत्त्वाचे म्हणजे लग्नानंतर तीन वर्षांनंतरही पतीने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवले नाही. तो पत्नीसोबत खोलीत झोपण्यास नकार देत होता. त्याऐवजी तो आईसोबत झोपत होता. यावर पत्नीने विचारले असता आईच्या आजारपणाचे कारण सांगून तो विषय टाळत होता. हे ही वाचा-भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला अघटित घडलं; दोन सख्ख्या बहिणींची क्रुरपणे केली हत्या एके दिवशी पतीचा मोबाइल पत्नीच्या हाती लागला. तिने व्हॉट्सअॅप वेबवरुन मोबाइल कनेक्ट केला. त्यानंतर तिने जे काही पाहिलं त्यामुळे तिला जबरदस्त धक्काच बसला. या व्हॉट्सअॅप चॅटवरुन आपली पती गे म्हणजे समलिंगी असल्याचे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर परिणीतीने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. लग्नानंतर सासरच्यांकडून हुंड्यासाठी वारंवार छळ केला जात होता. सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. परिणीतीच्या वडिलांनी लग्नानंतर 1 लाखांची रक्कम एफडीमधून काढून दिली. दुसरीकडे मुल होत नसल्यामुळे सासरच्यांकडून तिला टोमणे ऐकावे लागत होते. जेव्हा पत्नीला कळालं की तिचा नवरा समलिंगी आहे आणि त्याचे इतर पुरुषांशी प्रेमसंबंध आहे, तिला खूप धक्का बसला. गेल्या 5 वर्षांपासून ती सासरच्यांकडून छळ सहन करीत होती. अखेर तिने पतीबरोबरच सासरच्या मंडळींविरोधातही तक्रार दाखल केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gujrat

    पुढील बातम्या