Home /News /crime /

पतीचे अनैतिक संबंध झाले उघड, पत्नीने 3 वर्षांच्या मुलीसह मारली विहिरीत उडी!

पतीचे अनैतिक संबंध झाले उघड, पत्नीने 3 वर्षांच्या मुलीसह मारली विहिरीत उडी!

यावरून दोघांमध्ये वाद होत होता. त्यामुळे तो तिला मारहाण करायचा. तर पती सासू, सासरे व ननंद हे तिला माहेरावरून शेतीचा वाटा आण यासाठी त्रास द्यायचे.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 20 मे : बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील रायपूर येथील माळवंडी इथं एका विवाहित महिलेनं आपल्या 3 वर्षांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. पतीचे अनैतिक संबंध आणि सासरच्याकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील माळवंडी येथील पल्लवी गणेश चव्हाण (वय 30) हिने मुलगी जान्हवी गणेश चव्हाण (वय 3) हिला घेऊन विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. मृत महिलेच्या वडिलांनी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या; लग्नाला झालं होतं फक्त एक वर्ष यामध्ये पल्लवीचे पती गणेश चव्हाण याचे बाहेर अनैतिक संबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद होत होता. त्यामुळे तो तिला मारहाण करायचा. तर पती सासू, सासरे व ननंद हे तिला माहेरावरून शेतीचा वाटा आण यासाठी त्रास द्यायचे. तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून पल्लवीने टोकाचे पाऊल उचलले.  आपल्या 3 वर्षांची मुलगी जान्हवी चव्हाण हिच्यासह गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मृतक महिलेच्या वडिलांच्या तक्रारी वरून गुन्हे दाखल केले आहे. प्रेत पंचनामासाठी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून तिघांचा आत्महत्या दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात (Dhule District) एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या (Mass suicide) केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दमाशी येथील तापी नदीच्या पुलावरून (Tapi river bridge) या कुटुंबाने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भोद गावात राहणारे राजेंद्र रायभान देसले यांनी आपली पत्नी आणि मुलीसह नदीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. धरणगाव-एरंडोल तालुका शेतकरी संघाचे ते संचालक असल्याची माहिती समोर येत आहे. राजेंद्र रायबन पाटील (51) हे आपली पत्नी वंदना राजेंद्र पाटील आणि मुलगी ज्ञानल सोबत अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. 'मोदीजी हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन...?', दिल्लीनंतर मुंबईत पोस्टरबाजी, पाहा PHOTOS कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे कुटुंब आपल्या कारने भोद येथे जाण्यासाठी निघाले होते मात्र, काही वेळात त्यांचा मोबाइल क्रमांक बंद झाला. नातेवाईकांनी त्यांच्यासोबत संपर्क साधला मात्र, फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 17 मे रोजी त्यांची कार तापी नदीजवळ आढळून आली. यानंतर नदीपात्रात शोधाशोध सुरू करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर तिघांचे मृतदेह आढळून आले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या