Home /News /crime /

विकृत! पतीचं घृणास्पद कृत्य; पत्नीचं प्रायव्हेट पार्ट तांब्याच्या तारेनं शिवलं

विकृत! पतीचं घृणास्पद कृत्य; पत्नीचं प्रायव्हेट पार्ट तांब्याच्या तारेनं शिवलं

पत्नी-पत्नीमध्ये वाद होतात, मात्र हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे.

    लखनऊ, 21 मार्च : पती-पत्नीमधील वादाच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यांच्यातील वादातून अनेकदा एकमेकांचा जीव घेण्यापर्यंतची मजल जाते. अशातच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपुरमध्ये एका नराधमाने दानवपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहे. विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून या व्यक्तीने आपल्या पत्नीवर केलेले अत्याचार ऐकून अंगावर काटा उभा राहिलं. ( wifes private part was sewn with copper wire) या अत्यंत क्रूर घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्य़ाशिवाय पीडित महिलेला उपचार करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. जनपद रामपूर येथे राहणारा हा नराधम आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत होता. या गोष्टीवरुन पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं होत असे. असाच वाद सुरू असताना पती हिंसक झाला व त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिला ओरडत होती. यादरम्यान पतीने पत्नीचा प्रायव्हेट पार्ट तांब्याच्या तारेने शिवून घेतला. हे ही वाचा-मोठेपणी घेतला लहाणपणी केलेल्या लैंगिक अत्याचाराचा बदला,16 जणांच्या हत्येची कबुली यादरम्यान महिलाची प्रकृती बिघडली आणि पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून आरोपीची चौकशी केली जात आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, पतीने त्याच्या शरीरावर टाके लावले. पती मला पापी समजतो. ( wifes private part was sewn with copper wire) मी झोपलेली असताना सकाळी सहा वाजता त्याने माझे हात, पाय बांधून ठेवले आणि माझ्या तोंडात कपडा कोंबला. मला ओरडताही येत नव्हतं. त्याने तांब्याच्या तारेने टाके लावले. महिलेने सांगितलं की, तिचा पती तिच्यावर संशय घेतो.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, PRIVATE part, Uttar pradesh, Wife and husband

    पुढील बातम्या