बोकारो, 15 एप्रिल : झारखंडमधील (Jharkhand News) रामगड जिल्ह्याचे डीसीपी किशोर कुमार रजन आणि त्यांची पत्नी वर्षा श्रीवास्तव यांच्यामधील वादाचं एक प्रकरण पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान वर्षा श्रीवास्तव यांनी सासरच्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. याशिवाय मोबाइल आणि पैसे देखील घेतल्याचं त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.
सुरुवातील वर्षा पोलीस ठाण्यात बसून तक्रार देत होती. मात्र कोणीच तिचं ऐकलं नाही. शेवटी तिने बोकारो एसपींना फोन केला आणि त्यांच्या आदेशानुसार हे प्रकरण समोर आलं. डीएसपींची पत्नी वर्षा श्रीवास्तव यांनी सांगितलं की, न्यायालयात करार झाल्यानंतर सेटलमेंट झाल्यानंतर डीएसपी पती किशोर कुमार रजन त्यांच्यासह सातत्याने मारहाण आणि छळ करण्याचं काम करीत होते. घरातील मंडळी डीएसपीचं दुसरं लग्न करू इच्छित होते. याबाबत कळाल्यानंतर सेटलमेंट करण्यासाठी आज ते आपल्या दोन वर्षांच्या मुलासह सासरी पोहोचली. येथे सासू-सासऱ्यांची भेट घेतली. इतक्यात दीर चित्तरंजन आणि जयप्रकाश तिला मारहाण करू लागले आणि बलात्काराचाही प्रयत्न केला. दोघांच्या पत्नीनेही त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यानंतर खेचत बाहेर काढण्यात आलं.
हे ही वाचा-आधी पत्नीवर गोळी झाडली, नंतर स्वत:ला संपवलं, पतीने असं का केलं?
वर्षांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ड्रायव्हरला घेऊन त्या गेल्या होत्या त्यालाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांच्याकडून मदत मिळाली नसल्याचं पीडितेने सांगितलं. या प्रकरणात वर्षाचा ड्रायव्हर कैलाश वर्माने ही जबाब दिला असून त्याने दिलेल्या माहितीनुसार, वर्षासोबत तिच्या सासरी मारहाण झाली होती.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.