Home /News /crime /

कैरी तोडल्याच्या संशयावरुन धक्कादायक प्रकार, नंदुरबारमध्ये पती-पत्नीला मारहाण

कैरी तोडल्याच्या संशयावरुन धक्कादायक प्रकार, नंदुरबारमध्ये पती-पत्नीला मारहाण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कैरीवरुन वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. (Dispute over Raw Mango) ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव (Dhadgaon) तालुक्यात घडली.

  नंदुरबार, 22 मे : सध्या उन्हाळा सुरू (Summer Season) आहे. उन्हाळा म्हणजे कैरीचा मौसम (Raw Mango) असतो. या काळात कैरीला मोठी मागणी असते. (Raw Mango Demand in Summer Season) अनेक घरात कैरीचे लोणचे याच कालावधीत बनवले जाते. यातच आता कैरीवरुन वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. (Dispute over Raw Mango) ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव (Dhadgaon) तालुक्यात घडली. नेमकं काय घडलं - झाडावरील आंबे (कैऱ्या) तोडण्याच्या वादातून पती-पत्नीला जोरदार मारहाण (Husband wife beaten in Dhadgaon) केल्याची घटना घडली आहे. आंब्याचा सिझन सुरू असल्यामुळे सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर आमसूल तयार केला जात आहे. आमसूल (Kokum) तयार करायला कैऱ्या लागतात. कैऱ्या तोडल्यावरुन वाद होत मारहाण करण्यात आली आहे. हेही वाचा - घरातच संपवलं आयुष्य, आईसह दोन लेकींची आत्महत्या, खोलीत सापडली सुसाईड नोट
  आंबे लपवण्याचा संशय - 
  सामा आरशी वळवी यांचे अंबारबारीपाडा शिवारात आंब्याचे झाड (Mango Tree) आहे. याठिकाणी रकमानसिंग टेंबऱ्या वसावे यांनी सामा वळवी यांच्या झाडावरुन आंबे तोडले आणि घरात लपवून ठेवले, असा संशय सामा वळवी यांनी घेतला. इतकेच नव्हे तर या कारणावरुन सामा वळवी याच्यासह जमावाने रकमानसिंग आणि त्याची पत्नी अनिता या दोघांना जोरदार मारहाण केली. या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात (Dhadgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Maharashtra News, Wife and husband

  पुढील बातम्या