Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपात गेला तुरुंगात, ती 12 वर्षांनंतर प्रियकराच्या घरात जिवंत सापडली! 

ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपात गेला तुरुंगात, ती 12 वर्षांनंतर प्रियकराच्या घरात जिवंत सापडली! 

शंभर दोषी सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये असं कायदा सांगतो. प्रत्यक्षात काही वेळा तसं होताना दिसत नाही.

शंभर दोषी सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये असं कायदा सांगतो. प्रत्यक्षात काही वेळा तसं होताना दिसत नाही.

शंभर दोषी सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये असं कायदा सांगतो. प्रत्यक्षात काही वेळा तसं होताना दिसत नाही.

  • Local18
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

अमेठी, 23 जानेवारी : शंभर दोषी सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये असं कायदा सांगतो. प्रत्यक्षात काही वेळा तसं होताना दिसत नाही. अनेक निर्दोष व्यक्तींना विनाकारण शिक्षा होते. अमेठीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलंय. एका व्यक्तीला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला. मनस्ताप झाला; मात्र 12 वर्षांनी पत्नी जिवंत असल्याचं लक्षात आलं.

अमेठीच्या अलीनगर भागात हे प्रकरण समोर आलंय. मनोज कुमार वर्मा पत्नी सीमा वर्मा हिच्यासोबत राहत होते. 25 मार्च 2011 ला अचानक पत्नी सीमा घरातून गायब झाली. खूप शोधाशोध करूनही तिचा पत्ता लागला नाही. पत्नीच्या माहेरच्यांनी मनोज वर्मा याच्यावर पत्नीचा खून करून मृतदेह लपवून ठेवल्याचा आरोप केला. पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. त्यानंतर मनोजला 11 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. कोठडीतून जामिनावर सुटल्यावर मनोजने पत्नीचा पुन्हा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच वेळी तो खटल्यासंदर्भात न्यायालयाच्या फेऱ्याही मारत होता. या सगळ्यात जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. त्यानंतर आता 10 जानेवारी 2023 ला मनोजला त्याची पत्नी जिवंत असल्याची बातमी समजली.

मनोज वर्मा याने जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्याची पत्नी 3 मुलांसोबत तिच्या माहेरीच राहत असल्याचं त्याला समजलं. त्यानंतर मनोजने रायबरेलीच्या भदोखर ठाण्यात माहिती कळवली. ती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिलेची चौकशी करून तिचा जबाब नोंदवून घेतला.

पत्नी-प्रेयसी अन् मुलांचा संसार एकाच छताखाली; 4 जणं अचानक गायब, ज्या अंगणात खेळले तेथेच मुलांना...

मनोज वर्मा याच्या म्हणण्यानुसार, पत्नी सीमाने एका माणसासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. हे माहीत असूनही तिच्या घरच्यांनी आपल्यावर तिला मारल्याचा आरोप केला व खोटा खटला दाखल केला. यामुळे त्याला काही दिवसांची कोठडीही झाली. तब्बल 12 वर्षं चाललेल्या या खटल्यात आपलं नुकसान झालं असून रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला होता, असं त्याचं म्हणणं आहे. 'आता पत्नीने न्यायालयात कबुलीजबाब द्यावा म्हणजे मी निर्दोष सिद्ध होईन,' असंही त्याला वाटतंय.

या बनावट खटल्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पोलिसांच्या बेपर्वाईमुळे विनाकारणच मनोज वर्मा याला पोलीस कोठडीची शिक्षा भोगावी लागली. इतकंच नाही, तर गेल्या 12 वर्षांपासून त्याला न्यायालयात चकरा माराव्या लागताहेत. या संदर्भात रायबरेलीत विनंतीपत्र देण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत असल्याचं तिलोई सर्कलचे अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Crime news, Local18, Wife and husband