Home /News /crime /

प्रियकरासोबत मिळून तिनं शिक्षक पतीचा घोटला होता गळा, न्यायालयानं ठोठावली जन्मठेप

प्रियकरासोबत मिळून तिनं शिक्षक पतीचा घोटला होता गळा, न्यायालयानं ठोठावली जन्मठेप

प्रियकरासोबत स्वत:च्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. 2018 साली घडलेल्या या घटनेवर निर्णय देताना न्यायालयानं प्रियकर आणि पतीला जन्मठेपेची शिक्षा (wife and her lover got life imprisonment) ठोठावली आहे.

    डेहराडून, 03 सप्टेंबर : प्रेमात आंदळी झालेल्या एका महिलेनं तिच्या प्रियकरासोबत स्वत:च्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. 2018 साली घडलेल्या या घटनेवर निर्णय देताना न्यायालयानं प्रियकर आणि पतीला जन्मठेपेची शिक्षा (wife and her lover got life imprisonment) सुनावली आहे. 35-35 हजार रुपयांचा दंडही दोघांना ठोठावण्यात आला आहे. शिक्षक किशोर चौहान यांची 2018 मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह रायपूर पोलीस स्थानक परिसरातील रिंगरोडवर सापडला. किशोर चौहान यांच्या भावाच्या तक्रारीवरून किशोरची पत्नी स्नेहलता विरोधात रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी पत्नी स्नेहलता आणि तिचा प्रियकर अमित यांना अटक करण्यात आली. या दोघांचे दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते आणि दोघांना एकत्र राहायचे होते, असे पोलीस तपासात उघड झाले. प्रेमात अडथळा बनत असलेल्या शिक्षक पतीला अखेर कायमचे दूर करण्याचा प्लॅन या दोघांनी बनवला होता. ही घटना डेहराडून जिल्ह्यात घडली आहे. 15 जून 2018 रोजी किशोर यांचा स्नेहलतासोबत तिच्या प्रेमप्रकरणावरून वाद झाला आणि वादामुळे त्याने सकाळपासून दारू पिण्यास सुरुवात केली. तर स्नेहलता आणि अमितने यांनी आधीच त्यांचा कायमचा काटा काढण्याची योजना आधीच आखली होती. जेव्हा संध्याकाळी किशोर मद्यधुंद झाला, तेव्हा स्नेहलता त्याला कारमध्ये घेऊन आली. तिनं थेट अमितला  गाठलं आणि गाडी त्याच्याकडं दिली. अमित कार घेऊन सर्व्हे चौक, राजपूर रोडमार्गे रिंगरोडला गेला आणि तिथे त्याने दारूच्या नशेत किशोर चौहान यांचा गळा दाबला. हत्येनंतर अमितने सर्व पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि खुनाच्या दिवशी वापरलेला त्याचा मोबाईल हरिद्वारमध्ये टाकून दिला. जेव्हा पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा अखेरीस दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. हे वाचा - रेल्वेत अर्धनग्नावस्थेत आमदार महाशयाचं लाजिरवाणं कृत्य; प्रवाशांनी झापल्यानं त्यांनाही शिवीगाळ पोलिसांनी कसून चौकशी केली आणि.. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली, तेव्हा तपासात असे आढळून आले की, जून महिन्यात हे दोघे 200 पेक्षा जास्त वेळा बोलले आणि अमितने घटनेच्या दिवशी वापरलेला मोबाईल आणि सिम कार्ड काही तासांसाठी वापरले होते. 28 जून रोजी पोलिसांनी मृत शिक्षक किशोर चौहानची पत्नी स्नेहलता आणि तिचा प्रियकर अमित यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आणि तेव्हापासून दोघेही तुरुंगात होते. आता या दोघांना जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावण्यात आली आहे. स्नेहलता आणि तिचा प्रियकर अमित हे काॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र, काही वर्षांनी त्यांची सोशल मीडियावरून पुन्हा जास्त जवळीक वाढली होती. दोघेही विवाहित असताना त्यांनी केलेल्या अनैतिक कृत्याबद्द्ल या दोघांना आता चांगलीच अद्दल घडली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder news, Wife and husband

    पुढील बातम्या