महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला व्हिडीओमध्ये आपल्या प्रियकरासोबत होती. आरोपी रफीक मोहम्मद युनूस (50) याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: भिवंडी पोलिसांकडे सरेंडर केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनूस आणि त्याची पत्नी नसरीन आपल्या तीन मुलांसह भिवंडीतील अंसार भागात राहत होते. लॉकडाऊनदरम्यान युनूसची नोकरी गेली. ज्यानंतर नसरीन तीन मुलांसह नौगाव भागातील आपल्या बहिणीच्या घरी राहायला गेली.
पोलिसांनी सांगितले की युनूसची पत्नी नसरील आणि तिचा प्रियकर सद्दाम याच्यासह न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जेव्हा युनूसने हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याचा संताप झाला.
एका रिपोर्टनुसार यानंतर तो पत्नीला भेटण्यासाठी तिच्या बहिणीच्या घरी पोहोचला आणि तेथे सुरा खुपसून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो शांती नगर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांकडे सरेंडर केलं.
आरोपी पती युनूस हा पत्नीचे अन्य पुरुषासोबत असलेल्या संबंधामुळे त्रस्त होता