मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रियकरासाठी पत्नीची इच्छा पाहून पती हादरला; नकार दिल्याने फेसबुकवर दिसला परिणाम

प्रियकरासाठी पत्नीची इच्छा पाहून पती हादरला; नकार दिल्याने फेसबुकवर दिसला परिणाम

हा प्रकार पाहून कुटुंबाला धक्काच बसला आहे.

हा प्रकार पाहून कुटुंबाला धक्काच बसला आहे.

हा प्रकार पाहून कुटुंबाला धक्काच बसला आहे.

नालंदा, 29 मार्च : चंडी पोलीस ठाणे हद्दीतील तुलसी गड निवासी 35 वर्षीय राजीव राम यांची गळा चिरून हत्या केल्यानंतर मृतदेह फेकून दिला. मंगळवारी त्याच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. कथित प्रियकर आणि मानलेल्या भावाकडून पतीच्या हत्या केल्याच्या आरोपाखाली राजीवच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

तर पत्नीच्या मानलेल्या भावाचा तपास सुरू आहे. फेसबुकवर राजीवच्या मृतदेहाची फोटो व्हायरल झाल्यानंतर ओळख पटवण्यात आली. 27 मार्च रोजी राजीव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तर तो 25 मार्च रोजी सायंकाळी पत्नीच्या सांगण्यावरुन हरनौत गेला होता. यानंतर तो बेपत्ता झाला. मृत राजीवच्या आईचा आरोप आहे की, त्याची पत्नी गुडियाने आपल्या माहेरील मित्र आणि मानलेल्या भावाकडून ही हत्या करवून आणली.

राजीवला दोन मुली आहेत. 10 वर्षांपूर्वी राजीवने घरातल्यांचा विरोध करून गुडियासोबत लग्न केलं होतं. तर गुडियाचं यापूर्वी दोन वेळेस लग्न झालं होतं. राजीव दिल्लीत राहत होता तर गुडिया हरनौत येथे भाड्याच्या घरात आपल्या माहेरच्या एका 30 वर्षांच्या तरुणासोबत राहत होती. शेजारच्यांना तिने तो भाऊ असल्याचं सांगितलं होतं.

होळीसाठी राजीव घरी आला होता. त्यावेळी गुडियाच्या मानलेल्या भावासोबत त्याचा वाद झाला. यानंतर तो तेथून आपल्या गावी निघून गेला. काही दिवसांनंतर गुडियाने राजीवला त्याच्या मानलेल्या भावाकडून 2 हजार रुपये आणण्यास पाठवलं. ज्यानंतर राजीव कधीच परतला नाही. कुटुंबीयांनी पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

हे ही वाचा-app द्वारे लोन घेताय तर सावधान, खेडमध्ये महिला आणि तरुणीसोबत घडला भयावह प्रकार

दुसरीकडे पोलिसांना एक मृतदेह सापडला. मात्र तो राजीव असल्याचं पोलिसांना माहिती नव्हतं. त्यांनी सोशल मीडियावर राजीवचे फोटो व्हायरल केले. यानंतर राजीवच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. तोपर्यंत पोलिसांनी त्याचा मृतदेह दफनही केला होता. मात्र कुटुंबीय आल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि कुटुंबीयांकडे दिला. या सर्व घटनेनंतर चौकशीदरम्यान राजीवची हत्या त्याच्या पत्नीने प्लान केल्याचं समोर आलं. तिला आपल्या प्रियकरासोबत राहायचं असल्याने तिने पतीची हत्या घडवून आणली.

First published:

Tags: Bihar, Crime news, Love, Murder