Home /News /crime /

पत्नी माहेरी गेली म्हणून पतीने गळा दाबून केली हत्या; दुष्कृत्यानंतर म्हणाला...

पत्नी माहेरी गेली म्हणून पतीने गळा दाबून केली हत्या; दुष्कृत्यानंतर म्हणाला...

पोलिसांनी तिचा मृतदेह पाहिला तेव्हा सोनीच्या तोंडात एक कापड कोंबले होते आणि तिच्या बांगड्याही तुटल्या. त्यांची तीन मुलं मात्र...

    नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : माझी काळजी घेत नाही म्हणून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीनेच याबाबत माहिती दिली. नवी दिल्लीतील शालीमार बाग भागात शनिवारी एका महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी पतीवर संशय घेतला. ही घटना घडल्यानंतर तो फरार होता. या घटनेनंतर शालिमार बाग पोलिसांनी महिलेच्या पतीचा शोध सुरू केला आणि यासाठी स्थानिक गुप्तचरांची मदत घेतली. आरोपी पतीला उत्तर प्रदेशातील जालौन स्थित माधोपुरमध्ये त्याच्या बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली आहे. हत्येचं कारण विचारताच त्याने सांगितलं की, पत्नीचा माहेरच्यांशी जास्त ओढा होता. ती पतीकडे लक्ष देत नव्हती. आरोपीचं नाव रमाकांत असल्याचे समोर आले आहे. हमीरपूरची राहणारी होती सोनी डीसीपी विजयंत आर्य यांच्या म्हणण्यानुसार शनिवारी सकाळी राखी नावाच्या मुलीने पोलिसात फोन करून सांगितलं की, तिच्या बहिणीची हत्या करण्यात आली आहे.  घटनेनंतर मेहुणा घटनास्थळावरून फरार झाला आहे. यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. सोनी असं मृत महिलेचं नाव आहे. ती मूळची हमीरपूर (उत्तर प्रदेश) येथील होती. सिंहलपूर गावात ती पती रमाकांत यांच्याबरोबर भाड्याच्या घरात राहत होती. तिचा पती कामगार आहे. जेव्हा पोलिसांनी तिचा मृतदेह पाहिला तेव्हा  सोनीच्या तोंडात एक कापड कोंबले होते आणि तिच्या बांगड्याही तुटल्या. त्यांची तीन मुलं झोपली होती. हे ही वाचा-लग्नाच्या तयारीदरम्यान महिला कॉन्स्टेबलवर झाडल्या गोळ्या; तरुणाने स्वत:वरही.. आरोपीला केली अटक एसएचओ राजेंद्र सिंह यांच्या देखरेखीखाली पोलीस पथकाला आरोपीला पकडण्याचे काम सोपविण्यात आले होते. आरोपीचा मोबाईल फोनला सर्विलान्सवर ठेवून त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला जात होता. यावर राखीने हमीरपूर, माधोपूर येथे असण्याची शक्यता व्यक्त केली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तेथून त्याला अटक केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Murder, Wife and husband

    पुढील बातम्या