मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुल होत नाही म्हणून पतीने केले पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने सपासप वार, पंढरपुरातील घटना

मुल होत नाही म्हणून पतीने केले पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने सपासप वार, पंढरपुरातील घटना

रागाच्या भरात आरोपी नागेशने बासमतीला जमिनीवर खाली पाडून ब्लेडने गळ्यावर वार करुन जखमी केलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला

रागाच्या भरात आरोपी नागेशने बासमतीला जमिनीवर खाली पाडून ब्लेडने गळ्यावर वार करुन जखमी केलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला

रागाच्या भरात आरोपी नागेशने बासमतीला जमिनीवर खाली पाडून ब्लेडने गळ्यावर वार करुन जखमी केलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला

पंढरपूर, 03 एप्रिल : मुल होत नाही आणि पत्नी माहेरावरून घरी येत नाही या रागातून संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने (blade attack) सपासप वार केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर (pandharpur) शहरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (pandharpur police) गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश विष्णू देवकुळे (रा. आंबेडकर नगर, पंढऱपूर) असं या आरोपीचं नाव आहे.  आरोपी नागेश देवकुळे हा आपली पत्नी बासमती देवकुळेसोबत आंबेडकर नगर भागात राहत होता. लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे घरात पती आणि पत्नीमध्ये वाद होत होते.

तसंच, सासू छाया विष्णू देवकुळे यांनी बासमती यांना घरातील कामाच्या कारणांवरुन व मुलबाळ होत नसल्याच्या कारणांवरुन शिवीगाळ करुन वाईट वागणूक दिली होती. एवढंच नाहीतर शारिरीक व मानसिक त्रास दिला होता. त्यामुळे सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी निघून गेली होती.

(Oneplus Nord 2 मध्ये पुन्हा ब्लास्ट, फोनवर बोलता बोलता झाला स्फोट; यूजर जखमी)

काही दिवसांनी आरोपी नागेश देवकुळे हा बासमतीच्या माहेरी गेला आणि गोंधळ घातला. 'तू आताच माझ्यासोबत नांदण्याकरीता ये' असे म्हणून शिवीगाळ करुन माहेरच्या लोकांसमोरच बासमतीला लाथाबुक्क्याने मारहाण केली.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, रागाच्या भरात आरोपी नागेशने बासमतीला जमिनीवर खाली पाडून ब्लेडने गळ्यावर वार करुन जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. बासमतीच्या घरच्यांनी मध्यस्थी करून नागेशला दूर सारलं आणि बासमतीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(काँग्रेसने कधी जातीपातीचे राजकारण केलं नाही, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ नागेश देवकुळे यांना तत्काळ अटक केली. नागेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेशला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नागेश यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुडीपाडव्याला दारू प्यायला म्हणून मुलाने केली जन्मदात्या बापाची हत्या

दरम्यान, गुडीपाडव्याच्या दिवशी वडिलांनी दारू प्यायली म्हणून मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी घनने प्रहार करीत हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद तालुक्यातील चिंचोली गावात घडली. कडूबा रामभाऊ घुगे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर नानासाहेब कडूबा घुगे असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

First published: