रायपूर, 13 ऑगस्ट : आपल्यावर रुसून पत्नी (wife) माहेरी गेल्याच्या रागातून पतीने (Husband) तिच्यावर चाकूने वार (Knife attack) केले. या घटनेमुळे पत्नी गंभीर जखमी (Seriously injured) झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. चाकू हल्ला केल्यानंतर हा तरूण तिथून पळून (ran away) गेला. 10 महिन्यांपूर्वीच त्यांनी एकमेकांशी पळून जाऊन लग्न (love marriage) केलं होतं.
प्रेमापासून हल्ल्यापर्यंतचा प्रवास
छत्तीसगडमधील भवानीपूर गावात राहणाऱ्या गीतांजली आणि राम प्रसाद यांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा होती. दोघंही एकाच जातीतील असल्यामुळे घरचे विरोध करणार नाहीत, अशी दोघांना अपेक्षा होती. मात्र तरीही घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. त्यानंतर दोघांनी रायपूरला पळून जात लग्न केलं होतं. सुरुवातीचे काही दिवस सुखाचे गेल्यानंतर राम प्रसादनं दारू पिऊन घरी यायला सुरुवात केली. त्याला याबाबत जाब विचारणाऱ्या गीतांजलीला तो मारहाण करत असे. या प्रकाराला वैतागून गीतांजली माहेरी निघून आली होती.
घरच्यांकडून समजूत
यानंतर घरच्यांनी दोघांचीही समजूत घालून त्यांना पुन्हा एकत्रितपणे परत पाठवलं होतं. मात्र त्यानंतरही राम प्रसादचं दारू पिणं आणि पत्नीला मारहाण करणं काही थांबलं नाही. याला वैतागून ती पुन्हा माहेरी निघून आली. याचा प्रचंड राग राम प्रसादला आला. तो चाकू घेऊनच घराबाहेर पडला.
हे वाचा -अपघातग्रस्त युवक मागत राहिला मदत पण जनता VIDEO काढण्यातच बिझी; विरारमधील घटना
अंघोळ करतानाच केले वार
रागाच्या भरात राम प्रसाद सासूरवाडीत पोहोचला, तेव्हा घरासमोरच्या तलावात त्याची पत्नी आणि सासू अंघोळ करत होत्या. तो तडक तलावात उतरला आणि त्याने हातातील चाकूने पत्नीच्या पोटात तीन-चार वार केले, अशी बातमी ‘दैनिक भास्कर’नं दिली आहे. यामुळं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गीतांजली गंभीर जखमी झाली. वार करून राम प्रसादने तिथून पळ काढला. गीतांजलीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती सध्या स्थिर असून जिवाला कुठलाही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Crime