मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /महिलेनं एका वर्षापासून प्रियकराला घरातच ठेवलेलं लपवून; अचानक पती घरी आला अन्...

महिलेनं एका वर्षापासून प्रियकराला घरातच ठेवलेलं लपवून; अचानक पती घरी आला अन्...

अलबामा येथे 58 वर्षीय फ्रँक रीव्स आपली पत्नी ट्रेसीसोबत राहत होते. 15 ऑगस्टला जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं, की त्यांच्या पत्नीसोबत एक अनोळखी व्यक्ती आहे.

अलबामा येथे 58 वर्षीय फ्रँक रीव्स आपली पत्नी ट्रेसीसोबत राहत होते. 15 ऑगस्टला जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं, की त्यांच्या पत्नीसोबत एक अनोळखी व्यक्ती आहे.

अलबामा येथे 58 वर्षीय फ्रँक रीव्स आपली पत्नी ट्रेसीसोबत राहत होते. 15 ऑगस्टला जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं, की त्यांच्या पत्नीसोबत एक अनोळखी व्यक्ती आहे.

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : एका व्यक्तीवर त्याच्याच पत्नीच्या प्रियकरानंच गोळ्या झाडल्याची (Husband Shot By Wife's Lover) धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा प्रियकर विवाहित दाम्प्त्याच्या (Married Couple) घरातच मागील एका वर्षापासून लपून राहत होता. यात त्याच्या प्रेयसीनं त्याची मदत केली होती. ती आपल्या पतीपासून लपून आपल्या प्रियकराच्या राहण्याची आणि खाण्याचीही व्यवस्था करत होती. ही घटना अमेरिकेतील (America) आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, अलबामा येथे 58 वर्षीय फ्रँक रीव्स आपली पत्नी ट्रेसीसोबत राहत होते. 15 ऑगस्टला जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं, की त्यांच्या पत्नीसोबत एक अनोळखी व्यक्ती आहे. त्यांना काही कळेल याआधीच या व्यक्तीनं त्यांच्यावर हल्ला केला. पाहता पाहता ते दोघं एकमेकांवर गोळ्या झाडू लागले. नंतर समजलं की हा अनोळखी व्यक्ती इतर कोणी नसून फ्रँक यांच्या पत्नीचा प्रियकर माइकल अमाकर आहे. त्यादिवशी ट्रेसीनं अमाकर याला आपल्या पती फ्रँकबद्दल सांगितलं नव्हतं, तिनं म्हटलेलं की कोणीतरी चोर घरात शिरला आहे.

आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची आत्महत्या; गावकऱ्यांनी महिलेला दिली शिक्षा

हे ऐकून अमाकरनं फ्रँकवर हल्ला केला. यानंतर फ्रँकनंही गोळी झाडली. या भांडणात फ्रँकच्या छातीवर गोळी लागली आणि अमाकरच्या पायाला गोळी लागली. दोघांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. इथे सांगण्यात आलं, की दोघांनाही गंभीर दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेसी आणि तिचा प्रियकर ड्रग्जच्या आधीन गेलेले. गोळीबार सुरू असतानाही ते दोघं नशेत होते. फ्रँक आणि ट्रेसीच्या घरामध्ये अमाकर मागच्या एका वर्षापासून लपून राहत होता. ट्रेसी त्याला जेवण, पाणी सर्व पुरवत असे. लघवीसाठी बाथरूममध्ये वारंवार जावं लागू नये यासाठी त्याला बाटल्या दिल्या गेल्या होत्या.

बायकोच्या घरच्यांचा त्रास सहन न झाल्यानं तरुणाची आत्महत्या, CMकडे केली ही मागणी

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रँक अत्यंत शांत स्वभावाचे असून ते जास्त लोकांना भेटतही नसत. या घटनेत दोघंही गंभीर जखमी झाले नाहीत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमाकरला अटक करण्यात आली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Love story, Viral news