मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

PUNE Crime : लव्ह मॅरेज करुनही मन नाही भरलं, दुसरीवर आला जीव, पत्नीसोबत केलं भयानक कांड

PUNE Crime : लव्ह मॅरेज करुनही मन नाही भरलं, दुसरीवर आला जीव, पत्नीसोबत केलं भयानक कांड

अटक करण्यात आलेला आरोपी

अटक करण्यात आलेला आरोपी

स्वप्नील सावंत हा मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथे एका खासगी रुग्णालयात कामाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पुणे, 23 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने बलात्कार, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या यासंबंधीच्या घटना घडत आहे. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केल्यानंतरही दुसऱ्या तरुणीवर जीव आला. यामुळे दुसऱ्यांदा केलेल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा खून केल्याची संपाजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

अत्यंत भयानक पद्धतीने त्याने आपल्या पत्नीला संपवले. ही संपाजनक घटना पुण्यातील मुळशी तालुक्यात घडली. स्वप्नील विभिषण सावंत (वय 23, मुळ रा. सांगवी, ता. आष्टी, जि. बीड) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर प्रियांका क्षेत्रे (वय 22 वर्ष) असे मृत पत्नीचे नाव आहे.

स्वप्नील सावंत हा मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथे एका खासगी रुग्णालयात कामाला होता. त्याचS प्रियांका क्षेत्रे नावाच्या तरुणीसोबत लव्ह मॅरेज झाले होते. यानंतर ते दोन्ही कासार आंबोली येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते. मात्र, दरम्यानच्या काळात स्वप्नील ज्या रुग्णालयातील कामाला होता, त्याठिकाणी असलेल्या एका परिचारिका तरुणीसोबत त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.

मात्र, स्वप्निलचे पहिले लग्न झाले होते. तरी त्याला या दुसऱ्या तरुणीशी लग्न करायचे होते. यातूनच मग त्याने अत्यंत भयानक पाऊल उचलत आपल्या पत्नीला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पत्नीला कोणताही त्रास नव्हता. मात्र, तरी स्वप्नील हा हॉस्पिटलमधून बीपी आणि शुगरचे इंजेक्शन चोरायचा आणि तिला घरी जबरदस्ती देत राहिला. या इंजेक्शनने पत्नी प्रियांकाला त्रास होऊ लागला आणि त्याने तिला घरातच मारुन टाकले.

हेही वाचा - विवाहितेसोबतचे अनैतिक संबंध जीवावर बेतले; नांदेडमधील तरुणाचा भयानक शेवट

इतकेच नव्हे तर त्यांनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा बनावही केला. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यासोबतच प्रियांकाच्या कुटुंबीयांनीही त्याच्याबद्दल तक्रार केली. यानंतर पोलीस तपासात हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पौड पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Love story, Murder news, Pune, Pune crime news