नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : प्रत्येक तरुणीसाठी लग्न खूप महत्त्वाचं असतं. मात्र पहिल्या रात्रीचं स्वप्न (Honeymoon Night) अर्धवट राहिलं तर तिच्यावर मोठा आघात होतो. असंच काहीसं करावल भागात राहणाऱ्या एका तरुणीसोबत घडलं. येथील एका तरुणीचं लग्न झालं. नवविवाहिता (Newly Married Couple) जेव्हा सासरी पतीच्या घरी पोहोचली तेव्हा तिला मिळालेली वागणूक पाहून तिला जबर धक्काच बसला. नवविवाहितेला पतीने काळी आणि जाड असल्याचं सांगून मधुचंद्र करण्यास नकार दिला. यानंतर मात्र तो सातत्याने विविध कारणं सांगत पत्नीपासून दूर जात राहिला. याबाबत जेव्हा पत्नीने नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याने याबाबत सांगितलं की, त्याला त्याची वहिनी आवडते.
आरोप आहे की, यानंतर नवविवाहितेला वारंवार हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. इतकच नाही तर लग्नाच्या काही वेळानंतर तिला सासरहून दुसऱ्या घरी शिफ्ट करण्यात आलं होतं. तेथे वीज-पाण्याची सोय नव्हती. नवऱ्याने तिला तेथेच सोडून दिलं आणि वहिनीकडे निघून गेला होता. तरुणीच्या तक्रारीनंतर दयालपूर पोलिसांनी पती आणि सासू-सासऱ्यांसह अन्य लोकांविरोधात हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा-तरुणीची छेड काढणं पडलं महागात, मार खाऊन काढाव्या लागल्या उठाबशा
नवरा सातत्याने नवविवाहितेकडे करीत होता दुर्लक्ष
राधिकाचं ( नाव बदललं आहे) लग्न 10 फेब्रुवारी 2019 रोजी करावल नगरमध्ये राहणाऱ्या श्याम (नाव बदललं आहे) याच्यासोबत झालं होतं. जेव्हा तरुणीचं लग्न ठरलं तेव्हा सांगण्यात आलं होतं की, श्यामचं करावल नगरमध्ये मोबाइल शॉप आहे. तो प्रत्येक महिन्याला 60,000 रुपये कमवतो. लग्नानंतर जेव्हा तरुणी लग्नानंतर आपल्या सासरी पोहोचली तेव्हा तिला सर्व विचित्र वाटलं. तरुणीला सर्वात मोठा झटका तर मधुचंद्राच्या दिवशी लागला. यावेळी पतीने मधुचंद्रास नकार दिला. तू काळी आणि जाड असल्याचं म्हणत तिला अपमान केला.
काही दिवसांनंतर सर्व ठीक होईल असं तरुणीला वाटत होतं. जेव्हा पत्नीला त्याला त्याच्या वागणुकीवरुन जाब विचारला तेव्हा तो म्हणाला की, मला माझी वहिनी आवडते. त्यामुळे मी तुला पतीचं सुख देऊ शकणार नाही. तरुणीने तिच्यासोबत लग्न करण्याचं कारण विचारलं तर त्याने कुटुंबीयांकडून दबाव केल्याचं कारण सांगितलं.
यानंतर सातत्याने तरुणीला सासऱ्यांकडून त्रास दिला जात होता. तिच्या सासूने लग्नाच्या काही दिवसातही तरुणीच्या अंगावरील सर्व दागिने काढायला लावले. पतीसह सासरची सर्व मंडळी हुंड्यासाठी टोमणे मारत होते. पतीकडे वारंवार कार, आणि इतक गोष्टींची मागणी केली जात असल्याची तक्रार तरुणीने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi, Wife and husband