Home /News /crime /

विकृतीचा कळस! नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोच्या आत्महत्येचा VIDEO, सोशल मीडियावर अपलोडही केला

विकृतीचा कळस! नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोच्या आत्महत्येचा VIDEO, सोशल मीडियावर अपलोडही केला

नवरा-बायकोच्या भांडणात बायकोने नवऱ्याला आत्महत्येची धमकी दिली. तिला परावृत्त करायचं सोडून आत्महत्येला (wife Suicide video) प्रवृत्त केलं. एवढंच नव्हे, तर या सगळ्याचं मोबाइलमध्ये चित्रिकरण करून त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोडही केला.

पुढे वाचा ...
चेन्नई, 23 सप्टेंबर: आजच्या जगात माणसाचा स्वभाव इतका विचित्र झालाय, की कोण कधी काय करू शकेल, याचा काही अंदाज लावणं शक्य होत नाही. अशक्यप्राय वाटणाऱ्या किंबहुना ज्याचा विचारही कोणाच्या मनात येणार नाही अशा अघटित, विपरीत घटना घडतात आणि मानवाच्या संवेदना बोथट झाल्याची भावना प्रबळ होते. आंध्र प्रदेशात नुकतीच अशी एक घटना घडली. वेगळीच विकृती समोर आली. नवरा-बायकोच्या भांडणात बायकोने नवऱ्याला आत्महत्येची धमकी दिली. (husband records wife suicide uploads video on social media)  नवऱ्यानेही तिला परावृत्त करायचं सोडून आत्महत्येला (Suicide) प्रवृत्त केलं. एवढंच नव्हे, तर या सगळ्याचं मोबाइलमध्ये चित्रिकरण करून त्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोडही (Suicide video) केला. पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे; पण त्याच्या बायकोला मात्र प्राणाला मुकावं लागलं आहे. 'एबीपी लाइव्ह'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. आंध्र प्रदेशातल्या (Andhra Pradesh) नेल्लोर (Nellore) जिल्ह्यातल्या आत्माकुर (Atmakur) नावाच्या शहराजवळ 22 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. खासगी बँकेच्या एटीएममध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असलेला एम. पेंचलैह (M. Penchalaiah) आणि त्याची पत्नी कोंडम्मा (Kondamma) यांच्यात भांडण झालं. त्यांच्या लग्नाला 12 वर्षं झाली असून, त्यांना दोन मुलंही आहेत. नगर प्रदेशातल्या दारिद्र्य निर्मूलन मोहिमेत एक संसाधन व्यक्ती म्हणून कोंडम्मा कार्यरत होती. पती कोंडम्माच्या चारित्र्यावर कायम संशय घेई आणि तिचा छळ करी. बुधवारीही त्याने तिचा त्याच संशयावरून छळ केला आणि त्यांच्यातला वाद विकोपाला पोहोचला. मुंबईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांची आत्महत्या; घराच्या गॅलरीतच घेतला गळफास तेव्हा रागावून कोंडम्माने आत्महत्या करण्याची धमकी दिली. तिने तसं काही पाऊल उचलण्यापासून तिला परावृत्त करायचं सोडून पतीने तिला आत्महत्या करण्यास चिथावणी दिली. त्या सगळ्याचं त्याने मोबाइलवर रेकॉर्डिंग केलं आणि ते सोशल मीडियावर अपलोड केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून एम. पेंचलैह याला अटक केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर यांनी दिली. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्याला उभं करण्यात आलं आणि त्याला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे.

आई इतकी निष्ठूर कशी झाली; वारंवार दूध मागतो म्हणून चिडून मुलाला उचलून आपटलं, जागीच मृत्यू

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्हिडिओत कोंडम्मा छतावरच्या पंख्याला कापड बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न करताना दिसत असून, पती तिला तसं करण्यापासून थांबवत नाही. उलट तो तिला आत्महत्या करण्यासाठी जणू भागच पाडतोय, असं त्यात दिसतं आहे. तो तसं बोलल्याचंही व्हिडिओत ऐकू येतं. हा व्हिडिओ पतीने कोंडम्माच्या माहेरच्या मंडळींनाही पाठवला. हा VIDEO दाखवणं अनैतिक असल्याने तो प्रसारित न करण्याचा निर्णय News18 ने घेतला आहे.
First published:

Tags: Andhra pradesh, Suicide

पुढील बातम्या