घृणास्पद! पत्नीने घराबाहेर दिला पहारा, जेव्हा नराधम पतीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

घृणास्पद! पत्नीने घराबाहेर दिला पहारा, जेव्हा नराधम पतीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on minor girl) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीच्या पत्नीनंही या काळ्या कृत्याला साथ दिली आहे. घरातील बंद खोलीत बलात्कार होतं असताना आरोपीच्या पत्नीनं घराबाहेर उभं राहून पहारा दिला आहे.

  • Share this:

रामपूर, 09 एप्रिल: अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on minor girl) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीच्या पत्नीनंही या काळ्या कृत्याला साथ दिली आहे. घरातील बंद खोलीत बलात्कार सुरू असताना आरोपीच्या पत्नीनं घराबाहेर उभं राहून पहारा दिला आहे. विशेष म्हणजे आरोपी व्यक्ती हा पीडित मुलीच्या वडिलांचा चांगला मित्र आहे. या घटनेची माहिती पीडितेनं आपल्या आई वडिलांना दिल्यानंतर त्यांना धक्काच बसला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील रामपूर (Rampur, Uttar Pradesh) येथील आहे. गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गल्लीत ही संतापजनक घटना घडली आहे. येथील 14 वर्षांची पीडित मुलगी होळीच्या दिवशी आपल्या आईबरोबर शेजारच्या घरी गेली होती. पीडित मुलीच्या वडीलांची आणि आरोपीची चांगली मैत्री होती. त्यामुळे दोन्ही परिवारात जिव्हाळ्याचे संबंध होते. होळीचा उत्सव साजरा केल्यानंतर पीडित मुलगी आपल्या आईसोबत जायला निघाली, तेव्हा आरोपी व्यक्तीनं तिला थांबवून घेतलं. आणि ती काही दिवस इकडे राहिलं असं सांगितलं. दोन्ही परिवारात चांगले संबंध असल्यानं पीडित मुलीच्या आईनंही आरोपीच्या शब्दाचा मान राखला.

(हे वाचा-महाराष्ट्रातील तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय)

पण पीडित मुलीची आई घरातून निघून गेल्यानंतर, आरोपीच्या पत्नीनं 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपल्या पतीसोबत एका खोलीत बंद केलं. याठिकाणी आरोपीनं अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. यावेळी आरोपीची पत्नी घराबाहेर थांबून पहारा देत होती. बलात्कार झाल्यानंतर आरोपी पती-पत्नीनं पीडित मुलीला धमकावलं आणि घटनेची वाच्यता न करण्यास सांगितलं.

(हे वाचा- 80 कोटींचा पाऊस पाडण्याचा दावा; मांत्रिकाने तरुणीला निर्वस्त्र केलं आणि...)

पण घटनेच्या दोन दिवसानंतर, पीडित मुलीनं रडतच तिच्यासोबत घडलेला गैरप्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पीडित परिवाराने घटनेची माहिती पोलिसांना देत आरोपी दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. यमन खान आणि रुमाना बेगम अशी या आरोपी पती-पत्नीची नावं असून पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: April 9, 2021, 9:10 AM IST

ताज्या बातम्या