मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मधुचंद्राच्या रात्रीच पतीने ठेवलेली अट ऐकून हादरली पत्नी; संसार सुरू होण्याआधीच घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

मधुचंद्राच्या रात्रीच पतीने ठेवलेली अट ऐकून हादरली पत्नी; संसार सुरू होण्याआधीच घटस्फोटापर्यंत पोहोचलं प्रकरण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

बँक अधिकारी असलेल्या पतीने मधुचंद्राच्या (Honeymoon) रात्रीच पत्नीसमोर अशी अटी ठेवली की हे प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचलं. नवविवाहितेचा संसार सुरू होण्याआधीच संपण्याच्या वाटेवर आहे.

  • Published by:  Kiran Pharate

रांची 08 डिसेंबर : झारखंडच्या (Jharkhand) सिंहभूम जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. यात बँक अधिकारी असलेल्या पतीने मधुचंद्राच्या (Honeymoon) रात्रीच पत्नीसमोर अशी अटी ठेवली की हे प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचलं. नवविवाहितेचा संसार सुरू होण्याआधीच संपण्याच्या वाटेवर आहे. लग्नानंतर पहिल्याच रात्री पतीने ठेवलेली अजब अट (Husband Puts Weird Condition before Honeymoon) ऐकून तरुणीने थेट पोलीस ठाणं गाठलं. लग्नानंतर हनिमूनला जाण्याऐवजी या तरुणीने थेट पोलीस ठाण्यात आणि कोर्टात धाव घेतली.

हेही वाचा - नवऱ्याचं बायकोवरील प्रेम इतकं उतू गेलं की सर्वांसमोर नको तेच घडलं; पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील पोटका ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. इथल्या एका गावातील तरुणीचं लग्न 18 जून 2018 रोजी परसुडीह येथील रहिवासी असलेल्या एका युवकासोबत हिंदू परंपरेनुसार झालं होतं. हा व्यक्ती एमबीएचं शिक्षण घेतल्यानंतर लखनऊमधील एका बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. तरुणीने सांगितलं की लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्रीच पतीने तिच्यासमोर दोन वर्षात आयएएस बनण्याची अट ठेवली.

महिलेनं आरोपी केला, की तिच्या पतीने असं न केल्यास हे नातं तोडण्याची धमकी दिली आहे. सुरुवातीला महिलेला ही मस्करी वाटली. महिलेचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या दिवशी तिचा पती मुलाखतीसाठी चालल्याचं सांगू घरातून बाहेर पडला आणि परत माघारी आलाच नाही.

हेही वाचा - Shocking! मॉलमध्ये महिलेचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच संताप येईल

पीडितेच्या म्हणण्यानुसार, यानंतर तिचा पती तिच्यासोबत फोनवरही बोलला नाही. जेव्हा तिने त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी पतीने बोलण्यास नकार दिला. महिलेनं सांगितलं की आपल्या आई-वडिलांची बदनामी होऊ नये म्हणून ती शांत राहिली. दुसरीकडे सासरकडचे लोकही दिला टोमणे देऊ लागले. या सर्वादरम्यान पतीने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. हे ऐकून पीडितेच्या पायाखालची जमिन सरकली. पीडित महिला सध्या अभ्यास करत असून आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय साध्य करून पतीला धडा शिकवण्याचा आणि त्याला शिक्षा देण्याचा निर्धार तिने केला आहे.

First published:

Tags: Ias officer, Wedding couple