Home /News /crime /

'दारू का पिता' विचारले म्हणून नवऱ्याने घातली पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड, पंढरपुरातील घटना

'दारू का पिता' विचारले म्हणून नवऱ्याने घातली पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड, पंढरपुरातील घटना

आपला पती दारूच्या आहारी गेल्यामुळे राधिका त्याला वारंवार दारू न पिण्याचा सल्ला देऊन समजूत काढत होती. यावरून राधिका आणि बाबा सावतराव यांच्यात भांडणे देखील झाली होती.

पंढरपूर, 12 नोव्हेंबर : दारू (alcohol ) पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असते म्हणून पतीने  कुऱ्हाडीने सपासप वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात (Pundharpur) घडली आहे. ऐन दिवाळी (Diwali) सणाच्या तोंडावर घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पंढरपूर शहरात हनुमान टेकडी गोशाळा परिसरात बुधवारी साडे तीनच्या वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मयत महिलेचे नाव राधिका बाबा सावतराव (वय 49, रा.जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी गोशाळा,पंढरपूर, जि. सोलापूर) असं आहे. कोरोनाकाळात नोकरी गमावणाऱ्यांसाठी सरकारचे Aatma Nirbhar Package 3.0,वाचा सविस्तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिलेचा पती बाबा लक्ष्मण सावतराव हा सतत दारू पित होता. दारूच्या तो प्रचंड आहारी गेला होता. आपला पती दारूच्या आहारी गेल्यामुळे राधिका त्याला वारंवार दारू न पिण्याचा सल्ला देऊन समजूत काढत होती. यावरून राधिका आणि बाबा  सावतराव यांच्यात भांडणे देखील झाली होती. बुधवारी दुपारी सुद्धा सावतराव दारू पिऊन आला होता. त्यामुळे राधिकाने त्याला हटकले होते. पण, दारू पितो म्हणून सारखे बोलते याचाराग मनात धरून त्याने घरातील लाकडं तोडण्याच्या कुऱ्हाडीने राधिकावर हल्ला केला. मानेवर डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केले.  डोक्यात घाव बसल्यामुळे राधिका जागेवरच कोसळली. रक्त प्रवाह जास्त झाल्यामुळे राधिकाने जागीच जीव सोडला. आश्रमात घुसून महाराजांवर 8 अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला, औरंगाबादेतील थरार घरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सावतरावचा मुलगा शिवम बाबा सावतराव (वय 19) याने पंढपूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृत राधिका यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मुलगा शिवम यांच्या फिर्यादीवरून वडील बाबा सावतराव याच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स.पो.नि. मगदुम करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या