लखनऊ, 19 ऑगस्ट : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) शाहजहांपूर (Shahjahanpur) येथे एक अतिशय धक्कादायक, क्रूर घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने माणुसकीची, क्रूरतेची मर्यादाच ओलांडली. या व्यक्तीने आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकल्याचा आरोप करण्यात आला (Husband pour boiling water on wife) आहे. हे कृत्य करण्यामागे अतिशय संतापजनक कारणही समोर आलं आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून महिलेला लगेगच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उकळतं पाणी तिच्या शरीरावर पडल्याने अतिशय वाईटरित्या महिला जळाली असून तिची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शाहजहांपूर येथील एसपी संजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये पीडित महिलेचं लग्न झालं होतं. या महिलेला तीन मुली आहेत. सर्वात लहान मुलीचा जन्म एक वर्षापूर्वी झाला होता. मुलगा होत नसल्याने आरोपी सत्यपालचा पत्नीवर राग होता. महिलेला माहेरहून 50000 रुपये आणण्यासाठी दबावही आणत होता. तो पत्नीला नेहमी त्रास द्यायचा, तिला जेवणही दिलं जात नव्हतं.
पीडित महिलेच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pardesh