मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकरासोबतच्या संबंधास विरोध करायचा पती; जुगारी पत्नीने एकदोन नाही तर 28 वेळा..

प्रियकरासोबतच्या संबंधास विरोध करायचा पती; जुगारी पत्नीने एकदोन नाही तर 28 वेळा..

परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्याच पत्नीविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नी घरखर्चाचे पैसे जुगारात खर्च करते आणि प्रियकरासोबत मज्जा मस्ती करत असल्याचा आरोप पतीने केला आहे.

  • Published by:  News18 Desk
धौलपूर, 20 जुलै : राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात पत्नीला प्रियकरासोबत मस्ती करण्यापासून रोखणे पतीला चांगलेच महागात पडले आहे. नवऱ्याच्या टोमणेबाजीमुळे पत्नीने त्याला 28 वेळा पोलीस ठाण्यात कोंडून ठेवले. तर त्रासलेल्या पतीने सांगितले की, इतकेच नाही तर त्याची पत्नी आई आणि मुलांनाही मारहाण करत असे. यामुळे त्रस्त झालेल्या पतीने अखेर न्यायालयाचा आसरा घेतला आहे. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध धौलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - धौलपूर शहर चौकीचे प्रभारी वीरेंद्र शर्मा यांनी सांगितले की, परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्याच पत्नीविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नी घरखर्चाचे पैसे जुगारात खर्च करते आणि प्रियकरासोबत मज्जा मस्ती करत असल्याचा आरोप पतीने केला आहे. इतकेच नव्हे तर त्याने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकराशी अश्लिल संवाद करतानाही बोलताना पकडल्याचे त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच पतीने आरोप केला आहे की, जेव्हा तो तिला तिच्या प्रियकरासोबत बोलायला किंवा संपर्क ठेवायला विरोध करतो तेव्हा पत्नी त्याची तक्रार करते आणि त्याला पोलीस ठाण्यात कोंडून ठेवते. पीडित पतीला त्याच्या पत्नीने 28 वेळा तुरुंगांत डांबले आहे. यासोबतच या त्याच्या पतीने या तरुणाची आई आणि मुलांवर अमानुष मारहाण केली, असा आरोप त्याने केला आहे. तर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. हेही वाचा - किन्नराशी होते संबंध; बदनामीच्या भीतीनं मध्यरात्री बोलावलं आणि... महिलेवर होतं लाखोंचं कर्ज - पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात पीडित तरुण पतीने सांगितले की, त्याच्या पत्नीने विविध महिला गटांकडून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याने ते कष्ट करून त्या भरले. मात्र, यानंतरही त्याची पत्नी घरखर्चासाठी दिलेले पैसे जुगारात खर्च करते. या प्रकरणाचा तपास करत असलेले टाऊन आउटपोस्टचे प्रभारी वीरेंद्र शर्मा यांनी सांगितले की, पीडित तरुणाने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. वास्तव काय आहे, हे तपासानंतरच समोर येणार असल्याचे ते म्हणाले.
First published:

Tags: Crime news, Rajasthan, Women extramarital affair

पुढील बातम्या