Home /News /crime /

धक्कादायक! पत्नी माहेरच्या लोकांसोबत फोनवर बोलत होती, पतीने कुऱ्हाडीने केली हत्या

धक्कादायक! पत्नी माहेरच्या लोकांसोबत फोनवर बोलत होती, पतीने कुऱ्हाडीने केली हत्या

Murder Case: हुंड्यावरून (Dowry) पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर, महिला आपल्या माहेरी फोनवर बोलत होती. त्यावेळी आरोपी पतीने अचानक महिलेवर कुऱ्हाडीने (Ax) निर्दयीपणे हल्ला केला आहे. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे.

    भिवानी, 19 जानेवारी: लग्नानंतर मोटारसायकलची मागणी पूर्ण करू न शकल्याने एका तरूणाने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली आहे. मृत महिलेला दोन निष्पाप मुलीही आहेत. हुंड्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर, महिला आपल्या माहेरी फोनवर बोलत होती. त्यावेळी आरोपी पतीने अचानक महिलेवर कुऱ्हाडीने निर्दयीपणे हल्ला केला. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत महिलेच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मृत महिला आपल्या माहेरी फोनवरून बोलत होती. तेव्हा आरोपी पतीने तिला घेवून जा,असं म्हणत तिला मारायला सुरुवात केली. या मारहाणीच्या आवाजानंतर संपर्क तोडला. या भांडणात पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच या हत्येप्रकरणी पती, सासू आणि काकांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भिवानीच्या कितलाना या गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून 2017 मध्ये मृत रीतूचा विवाह भिवानीतील कितलाना गावातील मुकेशशी झाला होता. सासरची लोकं रीतूकडे सतत हुंड्याची मागणी करत होते. हुड्यांच्या मागणीवरून पती पत्नीत नेहमी खटके उडत होते. याच वादातून काल रात्री मुकेशने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आरोपी पतीकडून मृत रीतूकडे सतत हुंड्याची मागणी केली जात होती, असा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे त्यांच्या मुलीवर अत्याचार होत होते, असंही या कुटुंबियांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मोटर सायकलसाठी रितूचा छळ केला जात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या गावात पंचायत घेऊन हे प्रकरण शांतही केलं होतं. एका आठवड्यापूर्वी माहेरच्या कुटुंबियांनी 30 हजार रुपयेही दिले होते. पण काल ​​रात्री तिची हत्या करण्यात आली, असा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या