मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीची हत्या करुन गुपचूप उरकला अंत्यविधी, पितळ उघडं पडताच पत्नीसह मुलाला अटक

पतीची हत्या करुन गुपचूप उरकला अंत्यविधी, पितळ उघडं पडताच पत्नीसह मुलाला अटक

Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथील एका महिलेनं आपल्या मुलाच्या (Wife and son) मदतीनं पतीची हत्या (Husband murder) केली आहे.

Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथील एका महिलेनं आपल्या मुलाच्या (Wife and son) मदतीनं पतीची हत्या (Husband murder) केली आहे.

Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथील एका महिलेनं आपल्या मुलाच्या (Wife and son) मदतीनं पतीची हत्या (Husband murder) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 16 मे: औरंगाबाद जिल्ह्यातील हुसेनपूर येथील एका महिलेनं आपल्या मुलाच्या (Wife and son) मदतीनं पतीची हत्या (Husband murder) केली आहे. मृत पती दररोज दारू पिऊन घरी येतो आणि त्रास देतो. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून आरोपींनी दारुच्या नशेत त्यांची हत्या ( murder under influence of alcohol) केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपी मायलेकरांनी कोणालाही न कळवता गुपचूप मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. कोणत्याही नातेवाईकाला न बोलावता मायलेकरांनी अंत्यसंस्कार केल्यानं या मृत्यमागं काहीतरी काळंबेर असल्याची भनक पोलिसांना लागली. याप्रकरणी तपास केला असताना, मायलेकानं हत्येची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

45 वर्षीय मृत पतीचं नाव नागुसिंह झंडुलाल नागलोत असून त्याची हत्या पत्नी भागाबाई नागुसिंग नागलोत आणि मुलगा सूरज यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नागुसिंग 13 मे रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यानंतर त्यानं पत्नी आणि मुलाशी कुरापती काढायला सुरुवात केली. यामुळे पती, पत्नी आणि मुलगा यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. पतीनं शिवीगाळ केल्यानंतर संतापलेल्या पत्नीनं आणि मुलानं दारुच्या नशेत असणाऱ्या नागुसिंग यांना लाकडी दांड्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

पत्नी आणि मुलानं लाकडी दांड्यानं केल्याले जबरी मारहाणीत नशेत असणाऱ्या नागुसिंग यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपी मायलेकांनी मृत पतीला पलंगावर नेवून ठेवलं. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला घरी बोलावून नागुसिंग हे दारूच्या नशेत बेशुद्ध झाल्याचं सांगितलं. यावेळी डॉक्टरांनी नागुसिंग यांना मृत घोषित केलं.

हे ही वाचा-8 व्या मजल्यावरून पडून डॉक्टर महिलेचा मृत्यू, प्रोफेसर पतीवर संशयाची सुई

यांनतर आरोपी पत्नी भागाबाई आणि मुलगा सूरज यांनी कोणत्याही नातेवाईकांना न बोलावता परस्पर अंत्यसंस्कार उरकून टाकले. अशा गुप्त पद्धतीनं अंत्यसंस्कार उरकून टाकल्यानं अनेकांना त्यांच्यावर संशय आला. तसेच नागुसिंग यांच्या मृत्यूमागं काहीतरी काळंबेर असावं, याची कुणकुण करमाड पोलिसांच्या कानावर आली. यानंतर करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा-Yavatmal News : प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या, एकटी असताना धारदार शस्त्राने वार

त्यांनी यावेळी आरोपी मायलेकाची चौकशी केली असता, मुलगा सूरजच्या अंगावर काही ठिकाणी हाणामारी केल्याचे व्रण आढळले. त्याचबरोबर घरात काही ठिकाणी रक्त सांडल्याचे डागही दिसले. त्यामुळे संशय बळावत गेल्यानं पोलिसांनी आरोपी मायलेकाची कसून चौकशी केली. पोलीस चौकशीदरम्यानआरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Murder, Wife and husband