Home /News /crime /

'माझ्या मुलाला सांभाळा', पती-सासूच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने घेतला गळफास

'माझ्या मुलाला सांभाळा', पती-सासूच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरने घेतला गळफास

रुचिता आणि मंगेश हे दोघेही पेशाने डॉक्टर आहे. दोघांना एक 6 वर्षांचा मुलगाही आहे.

नागपूर, 23 डिसेंबर : पती आणि सासूकडून हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून नागपूर (Nagpur) शहरातील एका डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हुंडाबळीची तक्रार दाखल करत पतीला अटक करण्यात आली आहे. नागपूर शहरातील बेलतवाडी हद्दीतील बेलतरोडी हद्दीतील नरेंद्रनगर भागातील उपेंद्र अपार्टमेंट मंगळवारी रात्री ही घटना घडली. रुचिता मंगेश रेवतकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पती मंगेश रेवतकर (वय 37) आणि सासू सुनंदा (52) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस बँकेमध्ये झिरो बॅलन्समध्ये सुरू करा खातं, मिनिमम बॅलन्सचं नो टेन्शन! रुचिता आणि मंगेश हे दोघेही पेशाने डॉक्टर आहे. रुचिता आणि मंगेश यांना एक 6 वर्षांचा मुलगाही आहे.  मंगेश हा धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. मंगेश आणि त्याची आई सुनंदा या दोघीही गेल्या चार वर्षांपासून रुचिताला माहेरून पैसे आण्यासाठी छळ करत होते. परंतु, रुचिताने यासाठी नकार दिला होता. मंगळवारी संध्याकाळी  रुचिता आणि मंगेश यांच्यात पैशावरून वाद झाला होता. त्यामुळे रोजच्या या कटकटीला कंटाळून रुचिताने खोलीत पंख्याला ओढळी बांधून गळफास घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंगेशला रुचिताचा गळफास लावलेला दिसून आला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. कोरोनाकाळात सुरक्षित पर्यटन; गोव्याप्रमाणे या राज्यातही पर्यटकांसाठी नवी सुविधा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रुचिताचा मृतदेह ताब्यात घेतला. खोलीची पाहणी केली असता रुचिताने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत रुचिताने पती आणि सासूचा उल्लेख केला आहे. माहेरू पैसे आणण्यासाठी पती आणि सासू दोघेही छळ करत होते. त्यामुळे त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे रुचिताने चिठ्ठीत लिहिले होते. तसंच माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा, अशी याचनाही तिने चिठ्ठीत केली होती.  रुचिताने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी पती मंगेश आणि सासूविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या