मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /हैवान! देहविक्रयासाठी पतीचा दबाव, नकार दिल्यामुळे केलं पत्नीचं मुंडण

हैवान! देहविक्रयासाठी पतीचा दबाव, नकार दिल्यामुळे केलं पत्नीचं मुंडण

 पतीनं आपल्या पत्नीवर देहविक्रयासाठी दबाव आणल्याची आणि त्याला नकार दिल्यामुळे (Husband makes wife bald as she denies prostitution pressure) पत्नीचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पतीनं आपल्या पत्नीवर देहविक्रयासाठी दबाव आणल्याची आणि त्याला नकार दिल्यामुळे (Husband makes wife bald as she denies prostitution pressure) पत्नीचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पतीनं आपल्या पत्नीवर देहविक्रयासाठी दबाव आणल्याची आणि त्याला नकार दिल्यामुळे (Husband makes wife bald as she denies prostitution pressure) पत्नीचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रांची, 9 नोव्हेंबर: पतीनं आपल्या पत्नीवर देहविक्रयासाठी दबाव आणल्याची आणि त्याला नकार दिल्यामुळे (Husband makes wife bald as she denies prostitution pressure) पत्नीचं मुंडण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्न (Wife files case on husband) झालेल्या आपल्या पत्नीला या नराधम पतीने देहविक्रय करायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तिला मारहाण करून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन देहविक्रयासाठी तिच्यावर दबाव आणला. मात्र अखेर पत्नीने पोलिसांत धाव घेत अन्यायाला वाचा फोडली.

शाळकरी वयात जडलं प्रेम

झारखंडमधील जामताडा भागात राहणाऱ्या आठवीतील मुलीचं तिच्या शेजारी राहणाऱ्या मुस्तकीम अन्सारीवर प्रेम जडलं होतं. काही दिवसांनंतर तिने त्याच्याशी मुस्लीम पद्धतीनं विवाह केला. मात्र काही दिवसांतच मुस्तकीमचं पहिलं लग्न झाल्याचं तिला समजलं. मुस्तकीमला पत्नी आणि सात मुलं होती. ही माहिती त्यानं लग्न होईपर्यंत लपवून ठेवली होती. ही बाब लक्षात आल्यामुळे धक्का बसलेल्या मुलीनं सासर सोडून पुन्हा माहेरी येण्याचा निर्णय घेतला. जवळपास सात महिने ती माहेरी राहिली. मात्र मुस्तकीमनं तिला समजावून पुन्हा घरी नेलं.

सुरू झाले अत्याचार

सासरी गेल्यानंतर मुस्तकीमनं आपल्या दुसऱ्या पत्नीवर अऩ्याय करायला सुरुवात केली. तिनं देहविक्रय करण्यासाठी तयार व्हावं आणि त्याचे पैसे आपल्याला द्यावेत, अशी जबरदस्ती करायला त्यानं सुरुवात केली. मुस्तकीम आणि त्याची पहिली पत्नी हे दोघं मिळून तिला मारहाण करू लागले. अनेकदा तिला वीजेचा शॉकदेखील देण्यात आला. तिने देहविक्रयाला तयारी दाखवली नाही, तर रेल्वे ट्रॅकवर टाकून तिचा जीव घेण्याची धमकीदेखील दिली.

हे वाचा- महिला आयोगाच्या मेसेजमुळे SEX रॅकेट उघड!स्पा सेंटरने दिली कॉल गर्ल्सची रेट लिस्ट

तरुणीची पोलिसांत धाव

रोजच्या अन्यायाला आणि दबावाला वैतागलेल्या तरुणीनं अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Jharkhand, Police, Wife and husband